Mangal Katu Yuti: कन्या राशीत होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशीच्या व्यक्तींनी राहावं सतर्क

Mangal Katu Yuti: मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह अग्निमय मानले जातात. या दोघांचे एकत्र येणे शुभ मानलं जात नाही. या काळात केतू आणि मंगळ यांची युती होणार आहे. बुधाच्या राशीमध्ये मंगळ सुखकारक राहत नाही, कारण ती त्याच्या शत्रूची राशी आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 31, 2023, 05:40 AM IST
Mangal Katu Yuti: कन्या राशीत होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशीच्या व्यक्तींनी राहावं सतर्क title=

Mangal Katu Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. दरम्यान यावेळी दोन ग्रहांचा संयोग होतो आणि या युतीचा परिणाम अनेक राशींवर होताना दिसतो. असंच मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह अग्निमय मानले जातात. या दोघांचे एकत्र येणे शुभ मानलं जात नाही. 

30 ऑक्टोबरला केतू ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याचवेळी मंगळ देखील या रासीमध्ये आधीपासून असणार आहे. त्यामुळे या काळात केतू आणि मंगळ यांची युती होणार आहे. बुधाच्या राशीमध्ये मंगळ सुखकारक राहत नाही, कारण ती त्याच्या शत्रूची राशी आहे. दरम्यान केतू आणि मंगळ या ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

केतू आणि मंगळ ग्रहाची युती तुमच्या चौथ्या घरात होणार आहे. त्यांच्या संयोगामुळे विचार न करता निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढणार आहे. तसंच या काळात जमीन, मालमत्ता, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित निर्णय घेणे टाळावं. पैशांच्या बाबतीत तुमचं मोठे नुकसान होऊ शकते. घरातील कुटुंबातील लोकांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. वैवाहिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात.

धनू रास

मंगळ आणि केतू तुमच्या राशीच्या दहाव्या घरात एकत्र येणार आहेत. ही युती तुमच्यासाठी अजिबात शुभ नसणार आहे. नोकरीच्या दृष्टीकोनातून हे शुभ नाही. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. तसंच सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरी सोडावी लागू शकते. विचार न करता गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका. धनहानी होण्याचे संकेत आहेत. 

कुंभ रास

मंगळ आणि केतू तुमच्या आठव्या भावात संयुक्त आहेत. या काळात अपघात होण्याची शक्यता निर्माण होतेय. मुख्य म्हणजे यावेळी खर्चावर नियंत्रण ठेवावं. फालतू खर्च वाढू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नुकसानही होऊ शकते. वेगाने वाहन चालवणे टाळा. जुना आजार पुन्हा एकदा समोर येऊ शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )