Mangla Gauri Vrat 2023 : मंगळा गौरी व्रत करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, मिळेल मनासारखा जोडीदार

Mangla Gauri Vrat 2023 : श्रावण महिन्यात  मंगळागौरी व्रत  केले जाते. या मंगळागौर व्रताला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित करतात. यावेळी त्या  एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. हे व्रत करण्यासाठी काही नियम आहेत.

Updated: Jun 21, 2023, 03:16 PM IST
Mangla Gauri Vrat 2023 : मंगळा गौरी व्रत करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, मिळेल मनासारखा जोडीदार title=
Mangla Gauri Vrat 2023 । Mangala Gauri Vrat Upay

Mangala Gauri Vrat Upay : मंगळा गौरी व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाते. मंगळा गौरीची पूजा करण्याचा हा विधी आहे. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. या दिवशी पती-पत्नी दोघांनी मिळून उपवास करुन महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली की त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते, असे सांगितले जाते. यंदा श्रावण  महिना 4 जुलैपासून सुरु होत आणि तो 31 ऑगस्टला संपणार आहे.

श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी खूप खास आहे. जे भक्त श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आराधना करतात. त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. मंगळागौरी व्रत देखील श्रावण महिन्यात केले जाते. ज्याप्रमाणे श्रावणातील प्रत्येक सोमवार भोलेनाथाच्या पूजेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरी व्रताला समर्पित असतो. 

वैवाहिक जीवनातील समस्या आणि कुंडलीतील मंगळ दोष होतील दूर 

मंगळागौरच्यावेळी विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि माता गौरीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी  हे व्रत करतात. या दिवशी माता पार्वतीची मंगला गौरीच्या रुपात पूजा केली जाते. यावेळी मंगळा गौरी व्रत 4 जुलैपासून म्हणजेच श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु होत आहे. यावेळी श्रावण पूर्ण 58 दिवसांचा असेल. या दरम्यान 9 मंगळा गौरी व्रत करता येणार आहेत. या काळात काही उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या आणि कुंडलीतील मंगळ दोषही दूर होऊ शकतात.

मंगळा गौरी व्रताच्यावेळी 'हे' करा काही उपाय

- ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत मंगळ दोष असेल तर मंगळवारी मंगळा गौरी व्रत करावे. या दिवशी पूजेनंतर माता मंगळा गौरी तसेच बजरंग बली यांच्या चरणांचा सिंदूर कपाळावर लावावा.

- मंगळ दोष कमी करण्यासाठी एका लाल कपड्यात बडीशेप बांधून पलंगाखाली ठेवावी. 

-  श्रावण महिन्यात किंवा मंगळा गौरी व्रताच्या दिवशी मंगळा गौरी मंत्र-ओम गौरीशंकराय नमःचा अधिकाधिक जप केल्यास विवाह जुळण्यास मदत होती.

- ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या लग्नात विलंब होत असेल तर मंगळा गौरी व्रताच्या दिवशी मातीचे रिकामे भांडे नदीत अर्पण करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)