close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | मंगळवार | २० ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा आहे, तुमचा आजचा दिवस  

Updated: Aug 20, 2019, 11:23 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | २० ऑगस्ट २०१९

मेष- आज पूर्ण विचार करुनच पुढे जा. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. नवं घर किंवा वाहनाची खरेदी कराल. कामाचा व्याप जास्त असेल. एखादा निर्णय तुमचं नुकसान करणारा ठरु शकतो. 

वृषभ- चांगल्या संधी मिळण्याचे योग आहे. धीर बाळगा. नोकरीच्या किंवा इतर कोणत्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. मनातील एखादी गोष्ट कोणालाही सांगू नका. नव्या कामाची सुरुवात करु नका. 

मिथुन- मित्रपरिवारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. जास्तीत जास्त समस्यांवर सहज तोडगा निघेल. एखाद्या वादामध्ये जितके जास्त गुंताल तितकेच जास्त अडचणीत याल.

कर्क- सध्याच्या घडीला तुमच्या हाती असणाऱ्या कामांसाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामांसाठी योग्य बेत आखावे लागू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य आहे. 

सिंह- स्थिरता, संरक्षण आणि सहजतेचा अनुभव घ्याल. कामात जास्त वेळ द्यावा लागणार आहे. जबाबदारीने काम करा. सावध राहा. काही कामांमध्ये कपात होईल. अपयशाची भीती असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या- महत्त्वाची कामं आटोपल्यानंतर मोकळ्या वेळात नीट विचार करा, पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आज तुम्ही भावनिक विचार जास्त कराल. आजूबाजूच्या व्यक्तींमुळे अडचणीत येऊ शकता. 

तुळ- येत्या काही दिवसांमध्ये मोठे फायदे होण्याचा योग आहे. स्वत:साठी वेळ काढा. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. कोणाशीही उगाचच वाद घालू नका. कामाच्या ठिकाणी एखादा मोठा वाद होऊ शकतो. 

वृश्चिक- एकाग्रतेची कमतरचा वारंवार जाणवू शकते. चातुर्य आणि समजुतदारपणे महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. काही महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. विचारपूर्वकपणे पुढे जा. 

धनु- ज्या कामांची जबाबदारी तुम्ही घेतली आहे, त्याचा सांगोपांग विचार करा. मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. काही महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात. 

मकर- इच्छेनुसारच काम करा. एखाद्या महत्त्वाच्या कामावरच जास्त लक्ष असेल. एक पाऊल पुढे जाण्यानं नुकसानच होणार आहे. करिअर, नोकरी या विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सध्याची वेळ चांगली नाही. 

कुंभ- तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील. कामाच्या पद्धतीत काही बदल करण्याची इच्छा होईल. ज्या कामांचा विचार कराल ती पूर्णच कराल. कोणा एका व्यक्तीशी मतभेद होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींपासून आणि व्यक्तींपासून दूरच राहा. 

मीन- नोकरी किंवा करिअरमध्ये बदल करण्याचा विचार कराल. यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल. मित्रांसमवेत जास्त वेळ व्यतीत कराल. काही मित्र तुमच्या कामात अडथळा म्हणून समोर येतील. 

डॉ. दीपक शुक्ल