मेष- संपूर्ण विचार करुनच आर्थिक निर्णय घ्या. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरु शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवी ऑफर मिळण्याची शक्यता, मित्रांची मदत होईल.
वृषभ- व्यवस्थित नियोजन केल्यास व्यवहारात फायदा होईल. ठरवलेली कामे पूर्णत्वाला जातील. नोकरी किंवा दैनंदिन जीवनात काहीतरी बदल करण्याचा विचार करा. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता.
मिथुन- आज तुम्ही नवे प्रयोग कराल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. अंतरात्म्याचा आवाज ऐका. लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग.
कर्क- नेटाने प्रयत्न केल्यास यश पदरात पडेल. तुमच्या योजना लोकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठराल. घरात एखादी अडचण उद्भवेल. एकांतात विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.
सिंह- हातातील एखादे काम पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न कराल. कामाचे दडपण असले तरी दिवस चांगला जाईल. आर्थिक आवक आणि नोकरीच्यादृष्टीने चांगला दिवस.
कन्या- नोकरी किंवा करियरविषयक समस्या मार्गी लागतील. नोकरीत बढतीचा योग. धंद्यात बऱ्याच काळापासून अडकून पडलेली येणी वसूल होतील.
तूळ- स्वत:वर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. वेळ पडल्यास लोकांशी ओळख वाढवा किंवा प्रवास करा. तुमच्या जीवनात लवकरच मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे जुन्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता. दुसऱ्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या, सकारात्मक राहा. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी गाठभेट होण्याची शक्यता.
धनू- बऱ्याच काळापासून असलेल्या समस्या संपतील. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. नव्या आणि आकर्षक लोकांशी गाठीभेटी होतील.
मकर- धैर्य आणि चिकाटीने केलेल्या कामाचे फळ आज पदरात पडेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळू शकते.
कुंभ- जीवनात बदलाच्या काळाला प्रारंभ होईल. अनेक गूढ गोष्टींविषयीची उत्सुकता वाढेल. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होईल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग.
मीन- एखादी योजना आखण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस. नोकरीत नवे पद किंवा ऑफर मिळण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता.