Margashirsha Purnima 2023 : या वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. या वर्षातील शेवटची पौर्णिमा कधी आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. मार्गशीर्ष महिना सुरु असलेल्या या महिन्यातील पौर्णिमा तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमा असं म्हणतात. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि तपस्या यांचं विशेष महत्त्व असल्याने जाणून घ्या तिथी, पूजा विधी, उपाय (Margashirsha Purnima 2023 rare yoga on the last full moon this year date shubh sanyog puja muhurt vidhi significance)
दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेलाच वर्षाअखेरची पौर्णिमा असते. या वर्षातील 2023 ची शेवटची पौर्णिमा तिथी 26 डिसेंबर मंगळवारी सकाळी 5.46 मिनिटांपासून 27 डिसेंबरला बुधवार सकाळी 6.02 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 26 डिसेंबरला पौर्णिमा तिथी साजरी करण्यात येणार आहे.
यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अनेक आश्चर्यकारक योगायोग जुळून आला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शुक्ल योग असून तो अत्यंत शुभ मानला जातो.. या योगात भगवान विष्णूची उपासना केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. यावेळी ही पौर्णिमा अनेक अर्थांनी खास आहे. याशिवाय या दिवशी ब्रह्मयोग आणि भाद्रव योगही असणार आहे. या शुभ योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना केल्याने शाश्वत फळ मिळतं अशी मान्यता आहे.
ब्रम्ह मुहूर्त - पहाटे 5 वाजून 22 मिनिटांपासून 6 वाजून 17 मिनिटांपर्यंत
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपासून ते 12 वाजून 42 मिनिटांपर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 2 वाजून 5 मिनिटांपासून ते 2 वाजून 46 मिनिटांपर्यंत
गोधूली मुहूर्त- सायं 5 वाजून 29 मिनिटांपासून ते 5 वाजून 56 मिनिटांपर्यंत
अमृत काळ - दुपारी 1 वाजून 18 मिनिटांपासून ते 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत
चंद्रोदय वेळ - सायं 4 वाजून 45 वाजेपर्यंत
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान नारायणाची पूजा करणे शुभ मानली जाते. त्यामुळे सकाळी उठून भगवंताचं चिंतन करून व्रताचा संकल्प करा. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची कृपा मिळविण्यासाठी विविध उपाय केल्यास फायदा मिळतो. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने भगवान विष्णूची आशीर्वाद प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या दिवशी केलेल्या दानाचे इतर पौर्णिमेच्या दिवसांपेक्षा 32 पट अधिक फळ प्राप्त होतं. त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असंही म्हटलं जातं.
या दिवशी गरजू व्यक्तीला दान करा.
पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणं शुभ मानलं जातं.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य देणं देखील विशेष लाभकारी मानलं गेलं आहे. चंद्राला अर्घ्य देताना त्यात कच्चं दूध, साखर, सफेद फुल, तांदूळ, चंदन एकत्र करुन अर्घ्य देणं शुभ मानलं जातं.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं देखील उत्तम मानलं गेली आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)