Lakshmi Narayan Rajyog: बुध-शुक्राच्या युतीने बनला लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Lakshmi Narayan Rajyog: मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्र यांचा संयोग झाला आहे. यांच्या संयोगामुळे खास लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. 29 जून रोजी बुध आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 14, 2024, 07:40 AM IST
Lakshmi Narayan Rajyog: बुध-शुक्राच्या युतीने बनला लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश title=

Lakshmi Narayan Rajyog: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. यावेळी बुध, ग्रहांचा राजकुमार आणि शुक्र, राक्षसांचा स्वामी ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशी बदलतात. बुध ग्रहाने 10 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता. 12 जूनला शुक्रानेही मिथुन राशीत प्रवेश केला आहे. 

अशा स्थितीत मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्र यांचा संयोग झाला आहे. यांच्या संयोगामुळे खास लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. 29 जून रोजी बुध आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत 12 जून ते 29 जून दरम्यान लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. हा तयार झालेला लक्ष्मी नारायण योग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

कन्या रास (Kanya Zodiac)

या राशीच्या लोकांच्या दहाव्या घरात लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. आर्थिक स्थितीही मजबूत असणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे. जर तुम्ही सरकारी कामात गुंतले असाल तर तुम्हाला त्यातही यशासोबत काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. अधिक पैसे कमवू शकता आणि बचत करण्यात यशस्वी देखील होऊ शकतात. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफ देखील चांगले राहणार आहे. 

धनु रास (Dhanu Zodiac)

या राशीमध्ये सातव्या घरात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांचं लव्ह लाईफ चांगले राहणार आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही आनंद मिळू शकणार आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. प्रलंबित कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्हाला नोकरीत यश आणि अनेक शुभ संधी मिळू शकतात.

कुंभ रास (Kumbha Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. करिअरमध्ये काही चढ-उतार येऊ शकतात. पण तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्यातही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )