ओठ किंवा नाकाच्याजवळ तीळ असलेले लोक नशिबवन असतात का? हे कशाचे संकेत आहेत, जाणून घ्या

 सामुद्रिक शास्त्रात आपल्या शरीराच्या रंगापासून ते आपल्या अंगावरील तिळापर्यंत सगळ्याच गोष्टीला महत्व आहे.

Updated: Jul 4, 2022, 06:54 PM IST
ओठ किंवा नाकाच्याजवळ तीळ असलेले लोक नशिबवन असतात का? हे कशाचे संकेत आहेत, जाणून घ्या title=

मुंबई : सामुद्रिक शास्त्रात आपल्या शरीराच्या रंगापासून ते आपल्या अंगावरील तिळापर्यंत सगळ्याच गोष्टीला महत्व आहे. आपल्या अंगाच्या विशिष्ट भागावरील तीळ किंवा त्या तिळाचा रंग हा व्यक्तीबद्दल खूप काही सांगून जातो. तर आज आपण होटांवर असलेल्या तीळाबद्दल बोलणार आहोत. असा तीळ असलेल्या व्यक्तीचं आरोग्य आणि भविष्य कसं असतं? हे सविस्तर जाणून घेऊ या.

जर एखाद्या व्यक्तीच्या ओठ आणि नाकाच्यामध्ये तीळ असेल तर ती व्यक्ती नेहमी कोणत्या ना कोणत्या त्रासाने घेरलेली असते.  या व्यक्तीच्या आयुष्यात दुःखाला अंत नसतो.

अशी व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात काही मोठ्या षडयंत्राचा बळी ठरते आणि त्याच्या बचावात तो इतर अनेक चुकीच्या गोष्टी करू लागतो ज्यामुळे त्याला पुढे देखील दुखं भोगावे लागते किंवा असे म्हणता येईल की, परिस्थितीमुळे अशी व्यक्ती कोणाची तरी प्यादी बनते. म्हणजेच या व्यक्तीला स्वत:चं अस्तित्व उरत नाही.

मूल नक्षत्रात जन्मलेल्या मुलाचा स्वभाव कसा असतो?

जर एखाद्या व्यक्तीचा जन्म मूल नक्षत्रात झाला असेल, तर अशी मुले इतरांपेक्षा भिन्न विचारांची असतात. ते हुशार, यशस्वी आहेत, परंतु जर ते अशुभ प्रभावाखाली असतील, तर या नक्षत्रात जन्मलेले मूल राग आणि मत्सर करतात. यासोबतच अशा लोकांचे आरोग्यही चांगले नसते.

मूल नक्षत्राचा अधिपती ग्रह केतू आहे, तर राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर आयुष्यभर गुरु आणि केतू या दोघांचा प्रभाव असतो.

केतू नकारात्मकतेला जन्म देत असेल, तर बृहस्पतिमुळे जीवनात सकारात्मकता येते. या नक्षत्रात जन्मलेले लोक अत्यंत कठीण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतात. हे लोक मजबूत मनाचे असतात आणि त्यांचे लक्ष त्यांच्या ध्येयांवर केंद्रित ठेवतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)