Money Plant : घरात मनी प्लांट लावताय ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!

Vastu Tips : मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊन मोठं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावर कोसळू शकतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Updated: Feb 23, 2023, 06:17 PM IST
Money Plant : घरात मनी प्लांट लावताय  ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!  title=

Money Plant Upay : अनेक जण आहेत ज्यांना घरी ऑफिसमध्ये छोटीशी रोपं किंवा झाडं लावायला खूप आवडत. काही जण अशी आहेत ज्यांना झाडं- झुडपं लावण्याचा छंद असतो. मनी प्लांट घरात ठेवायला बऱ्याच लोकांना आवडतं, त्याचसोबत कोणाला एखादं रोपटं भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल तर आपण मनी प्लांटचा विचार करतो. पण तुम्हाला माहित आहे का ? मनी प्लांट आपण इतरांनी घरात (astrology tips) लावलंय म्हणून लावू नये. किंबहुना लावलंच तरी,  काही गोष्टी लक्षात ठेवा त्या पाळानाहीतर त्याचे उलट परिणाम वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला आणि कुटुंबाला भोगावे लागतील. चला जाणून घेऊया. 

वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये बांबूचे रोप लावणे खूप फायदेशीर (astrology tips) आहे. बांबूच्या रोपामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक संकट दूर होते. 

हे रोप व्यक्तीचं नशीब उजळण्याचं काम करते. मात्र, ते योग्य दिशेला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हे रोप योग्य दिशेला ठेवलं नाही तर तुमच्या आर्थिक स्थितीवर (financial problem upay) परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया मनी प्लांट लावण्यासाठी योग्य दिशा.

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला घर किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांट लावायचं असेल तर त्याची दिशा पूर्व दिशा आहे. या दिशेला मनी प्लांट लावल्यास घरात सुख-शांती राहते. यासोबतच आर्थिक स्थितीही सुधारते. हे रोप कधीही खिडकीजवळ ठेवू नये. कारण, ही वनस्पती उन्हात खराब होऊ शकते. याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरही होतो.

वास्तूनुसार 2 ते 3 फूट उंचीपर्यंत वाढणारी मनी प्लांट शुभ मानली जातात. ऑफिसमध्ये बांबूचं रोप लावल्याने वातावरण चांगलं राहतं आणि त्याचबरोबर तुमच्या मनात कोणतीही नकारात्मकता येत नाही. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटबद्दल अनेक समजुती आहेत. असं म्हटलं जातं 

की, मनी प्लांट लावल्याने रोग दूर होतात आणि व्यक्तीचे शरीर निरोगी राहते. शिवाय बेडरूममध्ये मनी प्लांट (money plant benefits) लावल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहतं आणि पती-पत्नीचे नातं अधिक मजबूत होतं.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)