Spirituality: सकाळी उठल्यावर करा हे एक काम, कधीच कमी पडणार नाही पैसा

Spirituality: सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस चांगला जातो. पण मग चांगला दिवस जाण्यासाठी नक्की काय करायला हवे? याबद्दल जाणून घेऊया. 

Updated: Sep 18, 2023, 04:12 PM IST
Spirituality: सकाळी उठल्यावर करा हे एक काम, कधीच कमी पडणार नाही पैसा  title=
good morning tips watching palm in the morning benefits and mantra rubbing hands get Money in marathi news

Spirituality: आपला प्रत्येक दिवस चांगला जावा, असे सर्वांनाच वाटते. आपल्या घरात कायम लक्ष्मीचा वास असावा. धनसंपत्ती आणि समृद्धीने आपलं घर भरलं असावा असं प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे. पण यासाठी आपल्यालाच आपल्या व्यवहारात चांगल्या सवयी अंगी बाणाव्या लागतात. यासोबतच देवदेवतांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न कराला पाहिजे. कोणी दुसरे व्यक्ती येऊन तुमचं नशीब नाही उजळवू शकतं. दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अगदी खरं पण आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही सकारात्मक झाली तर पुढे सगळं चांगलं होतं. अनेकांना माहिती नाही पण सकाळी उठल्यावर तळहाताला पाहणे हे शुभ मानलं जातं. त्या एका गोष्टीमुळे तुम्हाला कायम देवदेवतांचा आशिर्वाद मिळतो. लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात कायम पैसे येतात. 

सकाळी उठल्यावर 'हे' काम नक्की करा!

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपले तळहात पाहावे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, तळहातात देवी देवतांचा वास असतो. सकाळी उठल्यावर तळहात पाहिल्यास आपल्याला त्यांचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर तळहात पाहणे शुभ मानले जाते. असं केल्यास तुमचा दिवसही छान जातो. याशिवाय लक्ष्मी, सरस्वती आणि विष्णू हे आपल्या तळहातात वास करतात, सकाळी तळहात पाहिल्याने पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (good morning tips watching palm in the morning benefits and mantra rubbing hands get Money in marathi news)

'या' मंत्राचा जप करा

याशिवाय सकाळी उठल्यावर तळहात पाहाताना मंत्राचा जप केल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होते. तुमच्या जीवनात उत्साह आणि आनंद राहील. तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत. या मंत्राचा जप केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात.

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम॥

हा देखील एक फायदा 

असं मानलं जातं की दोन्ही हातांचे तळवे चोळून (rubbing hands in morning) डोळ्यांवर लावल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि ऊर्जा मिळते. तळहाताचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यासोबतच रक्ताभिसरणही चांगले होते आणि ते डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना उष्णता मिळते. जर तुम्ही नियमितपणे सकाळी 5 मिनिटं हात चोळले आणि डोळ्यांना लावले तर तुमच्या मनात चांगले विचार येतात आणि तुमचा दिवस चांगला जातो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)