मुंबई : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हटले जाते. हिंदू पंचागांनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त असतो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवशी केलेले शुभ काम कधीच क्षय होत नाही त्यामुळे याला अक्षय तृतीया म्हणतात.
या वर्षी अक्षय्य तृतीया १८ एप्रिल २०१८ या दिवशी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान परशुरामाचा जन्मदिवसही मानला जातो. तसेच या दिवशी विवाह करणाऱ्यांचे सौभाग्य अखंड राहते अशीही परंपरा आहे.
पुराणात असा उल्लेख आहे की वैशाख शुल्क पक्षातील तृतीयेला रेणुका माताच्या गर्भातून विष्णूने परशुरामाच्या रुपात जन्म घेतला होता. या दिवशी दक्षिण भारतात परशुरामाची जयंती उत्साहात साजरी केली जाते. तसेच या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पुजाही करतात. या दिवशी देवी प्रसन्न झाल्यास धनप्राप्ती होते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच जर एखाद्या कारणाने तुम्ही सोने खरेदी करु शकला नाहीत तर या दिवशी दान कऱण्याचे विशेष महत्त्व आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी पुजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी ५.५६ मिनिटांपासून ते दुपारी १२.२० पर्यंत आहे.
सकाळी ५.५६ मिनिटांपासून ते मध्यरात्रीपर्यंत खरेदीचा शुभ मुहूर्त आहे.