August 2023 : ऑगस्ट महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

August 2023 San Utsav In Marathi : यंदा अधिक मास आल्यामुळे सणं वार पुढे ढकल्या गेले. प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण उत्सव असतो. अमावस्या झाल्यानंतर अधिक मासाला सुरुवात झाली असून 16 ऑगस्टपर्यंत तो असणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होईल. अशात नागपंचमी, रक्षाबंधन सण कधी आहे जाणून घ्या ऑगस्ट महिन्यांतील सणांची योग्य तारीख...

नेहा चौधरी | Updated: Jul 30, 2023, 05:55 AM IST
August 2023  : ऑगस्ट महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी title=
Nag Panchami 2023 Rakshabandhan 2023 Ekadashi vrat Sawan somwar Shravan Month 2023 August 2023 Festival Calendar In Marathi

August 2023 Festival Calendar In Marathi : आषाढ महिना संपला की श्रावण सुरु होतो. नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. या श्रावणाचं आगमन म्हणजेच संस्कृती, परंपरा, सण-उत्सवाचा जणू काही मेळावाच. ऑगस्ट महिना उजाडला पण यंदा सण काही दिवसांनी पुढे सरकले आहेत. कारण यंदा अधिक मास आला. श्रावण अधिक मास सुरु आहे. पण ऑगस्टचा हा महिना अनेक सण उत्सव घेऊन आला आहे. चला मग संकष्टी चतुर्थीपासून नागपंचमी, रक्षाबंधनापर्यंत सगळ्यांची योग्य तारीख जाणून घेऊयात.  (Nag Panchami 2023 Rakshabandhan 2023 Ekadashi vrat Sawan somwar Shravan Month 2023 August 2023 Festival Calendar In Marathi)

ऑगस्ट महिन्यातील सण वार 

ऑगस्ट 1, 2023 (मंगळवार) -  अधिक मास पौर्णिमा 

4 ऑगस्ट 2023 (शुक्रवार) -  संकष्टी चतुर्थी

8 ऑगस्ट 2023 (मंगळवार) -़ कालाष्टमी

12 ऑगस्ट 2023 (शनिवार) - कमला एकादशी

13 ऑगस्ट 2023 (रविवार) - रवि प्रदोष व्रत

13 ऑगस्ट 2023 (रविवार) - अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)

13 ऑगस्ट 2023 (रविवार) - आचार्य अत्रे जयंती

14 ऑगस्ट 2023 (सोमवार) - अधिकमास मासिक शिवरात्री

15 ऑगस्ट 2023 (मंगळवार) - स्वातंत्र्य दिन, पतेती

16 ऑगस्ट, 2023 (बुधवार) - अधिकमास अमावस्या, अधिकारमास समाप्त

17 ऑगस्ट 2023 (गुरुवार) - सूर्य संक्रांती, श्रावण महिन्याला सुरुवात

19 ऑगस्ट 2023 (शनिवार) - हरियाली तीज

20 ऑगस्ट 2023 (रविवार) - श्रावण विनायक चतुर्थी

21 ऑगस्ट 2023 (सोमवार) - नाग पंचमी

21 ऑगस्ट 2023 (सोमवार) - पहिला श्रावण सोमवार 

22 ऑगस्ट 2023 (मंगळवार)  - पहिली मंगळागौर पूजा

22 ऑगस्ट 2023 (मंगळवार)  - कल्की जयंती

23 ऑगस्ट 2023 (बुधवार) - तुलसीदास जयंती

25 ऑगस्ट 2023 (शुक्रवार) - वरलक्ष्मी व्रत

27 ऑगस्ट 2023 (रविवार) - श्रावण पुत्रदा एकादशी

28 ऑगस्ट 2023 (सोमवार) - सोम प्रदोष व्रत

28 ऑगस्ट 2023 (सोमवार) - दुसरा श्रावण सोमवार

29 ऑगस्ट 2023 (मंगळवार) - दुसरी मंगळागौर पूजा

30 ऑगस्ट 2023 (बुधवार) - नारळीपौर्णिमा 

30 ऑगस्ट 2023 (बुधवार) - रक्षाबंधन

31 ऑगस्ट 2023  (गुरुवार) -  निज श्रावण पौर्णिमा

श्रावण सोमवार तारीख

21 ऑगस्ट 2023 (सोमवार) - पहिला श्रावण सोमवार 

28 ऑगस्ट 2023 (सोमवार) - दुसरा श्रावण सोमवार

मंगळागौर पूजा तारीख 

22 ऑगस्ट 2023 (मंगळवार)  - पहिली मंगळागौर पूजा

29 ऑगस्ट 2023 (मंगळवार) - दुसरी मंगळागौर पूजा