New Year 2024 : 1 जानेवारी 2024 ला 5 शुभ योग! वर्षभर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

New Year 2024 : वर्ष 2024 ची सुरुवात अतिशय शुभ योगायोग जुळून आला आहे. 1 जानेवारी 2024 या दिवशी 5 दुर्मिळ योग जुळून आला आहे. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Dec 27, 2023, 09:14 AM IST
New Year 2024 : 1 जानेवारी 2024 ला 5 शुभ योग! वर्षभर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय  title=
New Year 2024 5 auspicious yoga on 1 January 2024 Do these measures or upay to get financial benefits throughout the year

New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करतात. काही जण बाहेरगावी फिरायला जातात. तर काही लोक देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करतात. नवीन वर्ष 2024  सुख, समाधान आणि समृद्धीने भरलेलं असावं हे प्रत्येकाला वाटतं. नवीन वर्ष 2024 हे तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरु शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2024 काही विशेष राजयोग निर्माण होत आहेत. या दिवशी 5 दुर्मिळ योगामध्ये काही उपाय केल्यास तुम्हाला वर्षभर आर्थिक लाभ होईल असा दावा ज्योतिषशास्त्रात करण्यात आला आहे. (New Year 2024 5 auspicious yoga on 1 January 2024 Do these measures or upay to get financial benefits throughout the year)

1 जानेवारी 2024 पंचांग 

हिंदू महिना - मार्गशीर्ष
तिथी - पंचमी
पक्ष - कृष्ण
वार - सोमवार
नक्षत्र - मघा
चंद्र चिन्ह -  सिंह
सूर्य चिन्ह -  धनु
राहुकाल -  सकाळी 08.04 ते सकाळी 9.31

1 जानेवारी 2024 दुर्मिळ शुभ योग

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार, 1 जानेवारी 2024 ला आयुष्मान, आदित्य मंगल योग, गजकेसरी योग आणि लक्ष्मी नारायण योग असे 5 शुभ योग निर्माण होणार आहे. 

लक्ष्मी नारायण योग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 1 जानेवारी 2024 ला शुक्र आणि बुध ग्रह वृश्चिक राशीत असल्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. या योगामुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि संपत्ती वाढणार आहे. या योगात केलेले कार्य आरोग्य आणि समृद्धी देणारा ठरणार आहे. 

आदित्य मंगल योग

सूर्य आणि मंगळ 1 जानेवारी 2024 ला धनु राशीत असल्याने आदित्य मंगल योग तयार होणार आहे. आदित्य मंगल योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळणार आहे.

गजकेसरी योग

चंद्र 1 जानेवारी 2024 ला सिंह राशीत असणार आहे. तर 29 डिसेंबरला गुरु मेष येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला गुरूची पाचवी दृष्टी सिंह राशीवर पडणार असल्याने गजकेसरी योग तयार होणार आहे. गजकेसरी योगामुळे प्रत्येक कामात यश मिळणार असून धन, पद आणि पैशाची भरभराट होणार आहे. 

आयुष्मान योग

वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला पहाटे 03.31 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी 2024 ला पहाटे 04.36 वाजेपर्यंत आयुष्मान योग असणार आहे. आयुष्मान योगामध्ये भगवान शिव आणि भगवान गणेशाची साधना केल्याने दीर्घायुष्याचं वरदान मिळणार आहे. 

5 वर्षांत पहिल्यांदाच आला सोमवार 

5 वर्षांत पहिल्यांदाच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2024 ला सोमवार आहे. सोमवारपासून नवीन आठवडा सुरू आणि सोमवार हा भगवान शंकराची उपासना करण्याचा वार असल्याने नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि आनंद होणार आहे. अशा स्थितीत जे लोक या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक करतात त्यांच्यावर वर्षभर भगवान शंकराची कृपा बरसणार आहे. 

1 जानेवारी 2024 ला करा 'हे' उपाय!

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्यासोबतच शिव आणि विष्णूला अभिषेक करणे शुभ ठरणार आहे. त्याशिवाय देवी लक्ष्मीला कमलगट्टा अर्पण करा. दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र, चांदीचा हत्ती किंवा तांब्याची सूर्यमूर्ती घरात स्थापित करणे शुभदायक ठरणार आहे. 

वर्षाच्या पहिल्या दिवशी हेसुद्धा करा!

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी 2024 ला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः या मंत्राचा जप करा.
गणपतीला दुर्वा आणि तुळशीला जल अर्पण करा. 
सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी भोलेनाथाला अभिषेक करणं शुभ मानलं जातं. 
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला फलदायी ठरणार आहे. 
भगवान विष्णूच्या बीज मंत्र 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करताना केशर मिसळलेल्या दुधाने स्नान करणं शुभ ठरेल.
अन्न, वस्त्र, गूळ, तीळ, तांबे, गहू आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टी गरजूंना दान करणे फलदायी ठरतं. 
मध्यरात्री म्हणजेच निशित काल मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा शुभ ठरते. 
तुपाचा दिवा लावा आणि श्री सूक्ताचं पठण तुम्हाला सुख समाधान देईल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)