Panchang Today : आज अधिक मासातील कमला एकादशीसोबत हर्ष योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील कमला एकादशी तिथी सोबत हर्ष योग आहे. आजचा शनिवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

नेहा चौधरी | Updated: Aug 12, 2023, 06:39 AM IST
Panchang Today : आज अधिक मासातील कमला एकादशीसोबत हर्ष योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग? title=
today panchang 12 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha harsh yoga and saturday Panchang and Kamala Ekadashi Parama Ekadashi 2023 shravan adhik maas 2023 Shani Dev

Panchang 12 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील  कृष्ण पक्षातील उदय तिथीनुसार एकादशी आहे. पुरुषोत्तम मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कमला किंवा परमा तर काही ठिकाणी पुरुषोत्तमी एकादशी असं म्हणतात. (saturday Panchang)

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेवाचा वार आहे. आजचा दिवस अतिशय खास शुभ योगायोग जुळून आला आहे. अधिक मास आणि एकादशी ही विष्णुला समर्पित आहे. तर शनिवार शनिदेवाला. त्यामुळे आज दुहेरी योगायोग जुळून आला आहे. विष्णुसोबत शनिदेवाला प्रसन्न करण्याचा आजचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 12 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha harsh yoga and saturday Panchang and Kamala Ekadashi Parama Ekadashi 2023 shravan adhik maas 2023 Shani Dev) 

आजचं पंचांग खास मराठीत! (12 August 2023 panchang marathi)

आजचा वार - शनिवार

तिथी - एकादशी - 06:33:19 पर्यंत

नक्षत्र - आर्द्रा - पूर्ण रात्र पर्यंत

करण - बालव - 06:33:19 पर्यंत, कौलव - 19:25:04 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - हर्शण - 15:21:37 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:18:27 वाजता

सूर्यास्त -  19:08:22

चंद्र रास - मिथुन

चंद्रोदय - 27:25:00

चंद्रास्त - 16:25:00

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:49:55
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:18:27 पासुन 07:09:46 पर्यंत, 07:09:46 पासुन 08:01:06 पर्यंत

कुलिक – 07:09:46 पासुन 08:01:06 पर्यंत

कंटक – 12:17:45 पासुन 13:09:04 पर्यंत

राहु काळ – 09:30:55 पासुन 11:07:10 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 14:00:24 पासुन 14:51:44 पर्यंत

यमघण्ट – 15:43:04 पासुन 16:34:23 पर्यंत

यमगण्ड – 14:19:39 पासुन 15:55:53 पर्यंत

गुलिक काळ – 06:18:27 पासुन 07:54:41 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:17:45 पासुन 13:09:04 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)