Personality Test : आपल्या बोटामधील अंतर पटकन तपासा, नाही तर इतरांना कळेल तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य

Personality Test Hastrekha Shastra :  तुमच्या नकळत तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य इतरांना कळतं आहे. तुमच्या बोटामधील अंतर तुमच्या आयुष्यातील गुपित इतरांसमोर उघड करत आहे. 

Updated: Feb 18, 2023, 02:29 PM IST
Personality Test : आपल्या बोटामधील अंतर पटकन तपासा, नाही तर इतरांना कळेल तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य title=
Personality Test Finger Gap Astrology Hastrekha Shastra in marathi

Personality Test Finger Gap Astrology in marathi : तुमची पहिली झलक ही खूप महत्त्वाची असते. तुमच्या व्यक्तित्वाची ही पहिली झलक इतरांना तुमच्याबद्दलचं मत ठरविण्यास मदत करते. म्हणून म्हणतात पहिली झलक ही खूप महत्त्वाची असते. त्यातून आपलं व्यक्तित्वाची ओळख होते. त्याशिवाय आपली देहबोली आपल्या स्वभावाची ओळख करु देतात. त्यानंतर जेव्हा आपण संवाद साधतो आपली मते मांडतो आपलं यातून आपला खरा परिचय होतो. पण हस्तरेषा आणि समुद्रशास्त्रानुसार ही आपल्या भविष्यातील रहस्य इतरांना कळू शकतात. 

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांमधील अंतर हे तुमचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य उलगडू शकतं. एवढंच नाही तर बोटांच्या अंतरावरून व्यक्तीचं आरोग्यही कळू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार, तळहातांमधील अंतरावरून भविष्यातील अनेक रहस्ये जाणून घेता येतात. मग आता तुम्ही पण पाहू घ्या तुमच्या बोटामधील अंतर किती आहे ते...(Personality Test Finger Gap Astrology Hastrekha Shastra in marathi)

अंगठ्याजवळील बोट आणि मधले बोट यांच्यामध्ये रिकामी जागा असेल तर 

अशी व्यक्ती मुक्त विचारांची असतात. एवढंच नाही तर त्यामुळे त्यांना समाजात ओळख निर्माण होते. अशा लोकांना स्पष्टवक्ते मानले जाते. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रानुसार, जर दोन बोटांमधील अंतर खूप जास्त असेल तर असे लोक खूप स्वार्थी असतात. याशिवाय हे लोक त्यांच्या ध्येयाकडे खूप केंद्रित असतात. यासोबतच त्यांना जीवनात यशही मिळतं.

अनामिका आणि करंगळी अंतर जास्त असेल तर 

अनामिका आणि करंगळी यामध्ये बरेच अंतर असेल तर ते अशुभ मानलं जातं. अशा लोकांचा स्वभाव अतिशय रागीट असतो. एवढंच नाही तर हे लोक आपल्या हक्कासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. रागाच्या वेळी हे लोक योग्य आणि अयोग्य यातील फरक करू शकत नाहीत. त्याच वेळी, जेव्हा ही दोन बोटे पूर्णपणे एकत्र चिकटलेली असतात, तेव्हा व्यक्तीची विचारसरणी सकारात्मक असते. कुटुंबाच्या शांतीसाठी ते अनेक गोष्टी करतात.

अंगठ्याजवळील बोट अनामिकापेक्षा लहान असेल तर...

तर अशा व्यक्तीला अहंकारी असतात, असं शास्त्रात मानलं गेलं आहे. अशा लोकांना आदर मिळण्याची ऊर्मी असते. दुसरीकडे, जर अंगठ्याजवळील बोट अनामिकापेक्षा मोठी असेल तर अशी लोक गंभीर आणि जबाबदार असतात. या लोकांना आयुष्यात मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. दुसरीकडे, जर अंगठ्याजवळील बोटाची लांबी सामान्यपेक्षा कमी असेल, तर व्यक्तीमध्ये उत्साह आणि महत्त्वाकांक्षेचा अभाव असतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)