Adhik Maas 2023 : 'धोंड्याचा महिना' जावाईबापूंना बोलावणं धाडलं का?, सासू नव्हे, आईची भरा ओटी

Adhik Maas 2023 : अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना, या महिन्यात जावयाचे लाड केले जातात. तर अधिक मासात विवाहित लेकीने आईची ओटी नक्की भरावी.

नेहा चौधरी | Updated: Jul 18, 2023, 09:42 AM IST
Adhik Maas 2023 : 'धोंड्याचा महिना' जावाईबापूंना बोलावणं धाडलं का?, सासू नव्हे, आईची भरा ओटी title=
purushottam maas why son in law importance at dhonda or adhik maas and married woman fill her mothers oti ritual

Adhik Maas 2023 : दर 3 वर्षांनी अधिकचा महिना येतं असतो. महाराष्ट्रात या धोंड्याचा महिना असंही म्हणतात.  यावेळी तब्बल 19 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ योगा योग जुळून आला असून आजपासून श्रावण अधिक मास सुरु झाला आहे. महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला विशेष महत्त्व असतं. जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. 

मलमास (malmas 2023) किंवा पुरुषोत्तम महिना (purushottam maas) का असतो जावयाला एवढा मान? शिवाय अधिक महिन्यात विवाहित महिलांनी सासूची ओटी भरु नये पण आईची ओटी नक्की भरावी असं का सांगितलं जातं ते आज आपण जाणून घेणार आहात. (purushottam maas why son in law importance at dhonda or adhik maas and married woman fill her mothers oti ritual)

अधिक मासात जावयाचा थाटंच वेगळा?

अधिक महिन्यात जावयाचं कौतुक करुन त्याला सोन्या चांदीच्या वस्तू भेट म्हणून दिलं जातं. अगदी सासू सासऱ्यांचा मानपान केलं जातं. जावयला बोलणवं धोडून त्यांना अनारशाचं वाण दिलं जातं. आता तुम्ही म्हणाल जावयाला एवढा मान का? तर हिंदू धर्मात जावयला नारायणाचं रुप मानलं जातं. म्हणून तुम्ही कायम ऐकलं असाल नवरा बायकोला लक्ष्मी नारायणाचा जोडा बोललं जातं. अधिक मास हा विष्णूला समर्पित महिन्या असल्याने जावयाचा मान दिला जातो. 

अधिक मासात 33 अंकाला महत्त्व

वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर येतो. यानुसार पाहिलं तर 33 महिन्यांनंतर अधिकचा महिना येतं असतो. त्यामुळे 33 अंकाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे जावयाला 33 अनारसे वाण देण्याची परंपरा आहे. शिवाय 33 वस्तूचं दान, 33 जणांना अन्नदान, 33 जोडप्यांसह सामुहिक पूजा करण्याची रीत आहे. 

ही वस्तू जावयाला नक्की द्या!

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जावयला अधिक महिन्यात घरी बोलवल्यानंतर 33 अनारसेच्या वाणासोबतच एक चांदीचं निरंजन देऊन शुभ मानलं जातं. असं म्हणतात की चांदीचं निरंजन दिल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी प्रसन्न म्हणजे नारायण प्रसन्न...याचा अर्थ मुलगी प्रसन्न आणि जावय प्रसन्न...त्यामुळे लेकीच्या सुखासाठी जावयला चांदीचं निरंजन द्यावं असं म्हणतात. हे देताना जावयला 33 दिव्याने औक्षवान करण्याची परंपरा आहे. 

अधिक महिन्यातलं जावयाचं कौतुक हा छुपा हुंडा?

आजही धोंड्याचा महिन्यात जावयाला घरी बोलवून त्यांचा मान केला जातो. सोन्या चांदीच्या वस्तू दिल्या जातात. ऐपत नसल तरी कर्ज घेऊन जावयाचं मानपान केलं जातं. धोंड्याचा महिना आहे ना करावं लागतं...बस एवढ्यासाठी म्हणून सणाच्या नावाखाली छुपा हुंडा असल्याचं अनेक विवाहित लेकींना आणि समाजातील काही लोकांना वाटतं. 

आईची ओटी भरा पण सासूची नाही!

अशी मान्यता आहे की, अधिक मासात पुण्यकर्म केली जातात. त्यामुळे विवाहित लेकीने अधिक मासात आईची ओटी भरावी. कारण लग्नाच्या वेळी आई वडिलांनी मुलीचं कन्यादान केलं असतं. पालकांच्या या कन्यादानामुळे तिला सौभाग्य प्राप्त झालं असतं. त्यामुळे अधिक महिन्यात आईची ओटी भरुन त्यांचं कृतज्ञता व्यक्त करा असं, हिंदू धर्मात सांगण्यात आलं आहे. तर सासूची ओटी का भरायची नसते. कारण लग्नानंतर सून जेव्हा घरी येते तेव्हा सासू सूनेची ओटी भरुन तिला आपल्या मुलाची जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे सासूकडून मिळालेला हा आशीवार्द ओटी भरुन परत द्यायचा नसतो. 

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)