Putrada Ekadashi 2023: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात शुभ मुहूर्त सण असतात. त्या तिथींचं आणि सणांचं विशेष असं महत्त्व आहे. हिंदू धर्मात एकदाशीचं विशेष महत्त्व असून या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. विधीपूर्वक पूजा केल्यास भगवान विष्णुंची कृपा प्राप्त होते. तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होते. पौष महिना सुरु असून शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हंटलं जातं. 2 जानेवारी 2023 रोजी ही एकादशी असणार आहे. शास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्यास संतान सुख प्राप्त होतं. धर्मराज युधिष्ठिराला पौष पुत्रदा एकादशी व्रताचे महत्त्व भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते. या दिवशी भगवान नारायणाची पूजा केली जाते. हे व्रत पाळल्याने राजा सुकेतुमानला पुत्रप्राप्ती झाली होते. या एकादशीला वैकुंठ एकादशी नावाने संबोधलं जातं.
एकादशी तिथी 1 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी सुरु होते. तसेच 2 जानेवारीला संध्याकाळी 8 वाजून 24 या दिवशी संपते. उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशी व्रत 2 जानेवारीला आहे. पुत्रदा एकादशीचा पारण वेळ 3 जानेवारी मंगळवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांपासून सकाळी 9 वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल. 2 जानेवारीला भद्रा योग सकाळी 7.43 ते रात्री 8.23 पर्यंत असणार आहे. भद्रा काळात शुभ कार्य करत नाहीत. भद्रा काळात तुम्ही पूजा, मंत्र जप, ध्यान इत्यादी करू शकता.
बातमी वाचा- Vastu Tips: नववर्ष 2023 मध्ये करा हे उपाय, देवी लक्ष्मीची होईल कृपा
तुमची शारीरिक स्थिती चांगली असेल तर दशमीला म्हणजेच 1 जानेवारील एकदाच भोजन करा. तसेच दशमी आणि एकादशीला रात्री जमिनीवर निद्रा घ्या. दशमीच्या रात्री भगवान विष्णुंचं नामस्मरण करत झोपा. एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठवून दोन्ही हातांचं दर्शन घ्या. त्यानंतर माता-पिता आणि गुरुंना नमस्कार करा. त्यानंतर भूमिला वंदन करा. तसेच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा. आंघोळीनंतर हातात जल घेऊन भगवान विष्णुंच्या समोर व्रत संकल्प करा. या दिवशी विष्णु सहस्त्रनामावलीचं पठण करा.
एकादशीच्या उपवासात एकदा जेवणारे लोक रताळे, बटाटा, साबुदाणा, नारळ, काळी मिरी, सैंधव मीठ, दूध, बदाम, आले, साखर इत्यादी अन्नपदार्थांचे सेवन करू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)