Rahu-Mercury Conjunction In Pisces: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेक ग्रहांची युती देखील होते. मार्च महिन्याच्या 7 तारखेला बुध रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी जिथे राहु त्याच्याबरोबर उपस्थित असणार आहे. मीन राशीत राहु आणि बुध यांचा संयोग तब्बल 18 वर्षांनी होणार आहे. 2006 मध्ये या दोन्ही ग्रहांचा संयोग मीन राशीत तयार झाला होता.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला मायावी ग्रह मानलं जातं. बुध हा नोकरी, व्यवसाय, कुशाग्र बुद्धिमत्ता, विकास, शिक्षण इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. मीन राशीत राहु आणि बुध यांचा संयोग अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
वृषभ राशीच्या लोकांना राहू-बुधाचा संयोग शुभ परिणाम देणार आहे. करिअरमध्ये आश्चर्यकारक परिणाम मिळतील. नोकरदार लोक या काळात कठोर परिश्रम करतील, ज्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांकडून कौतुकही मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या संधी देखील मिळू शकतात. शेअर आणि सट्टा बाजारातून भरपूर नफा मिळू शकणार आहे. कौटुंबिक जीवन देखील चांगले राहणार आहे.
राहू-बुध युती कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. परदेशी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. राहू आणि बुध यांचे संयोग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. या काळात व्यावसायिक गरजांसाठी विविध सहलींची शक्यता असून या सहली तुमच्यासाठी शुभ ठरतील. तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी राहू आणि बुधाचा संयोग अद्भूत असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना या संयोगातून अनेक आर्थिक लाभ मिळतील आणि नफा मिळवण्यासाठी नवीन कल्पनांवर काम करतील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात काही खास व्यक्ती हस्तक्षेप करू शकतात. नोकरीतील लोकांना राहू आणि बुध यांच्या संयोगाने चांगला फायदा होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)