Rahu Gochar 2022: ऑक्टोबर 2023 पर्यंत 3 राशींच्या लोकांसाठी शुभ काळ

नोकरीत प्रमोशन आणि धनलाभाचे संकेत, 3 राशीच्या लोकांचं बदलणार आयुष्य  

Updated: May 21, 2022, 03:03 PM IST
Rahu Gochar 2022: ऑक्टोबर 2023 पर्यंत 3 राशींच्या लोकांसाठी शुभ काळ title=

मुंबई : राहु केतूचा आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. हे ग्रह जेव्हा एकत्र आपली रास बलतात तेव्हा ते तिरके चालतात. सध्या दोन्ही ग्रहांनी राशी परिवर्तन केलं आहे. त्यामुळे 2023 पर्यंत ही स्थिती कायम राहिली. त्याचा परिणाम काही राशींवर होणार आहे. राहु आणि केतु 3 राशींना खूप मोठा फायदा मिळवून देणार आहेत. 

ऑक्टोबर 2023 पर्यंत राहु आणि केतूच्या स्थितीमध्ये बदल होईल तोपर्यंत तीन राशीच्या लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे. या कालावधीमध्ये श्वानांना खायला द्या त्यांची सेवा करा. आपल्या कुंडलीमध्ये राहु-केतू मोठा फायदा देतील. 

वृषभ : करिअरमध्ये मोठी प्रगती होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ अत्यंत शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होणार आहे. राजकारणात सक्रीय असाल तर फायदा होईल, मान प्रतिष्ठा मिळेल आणि विदेशात जाण्याची संधी मिळेल.

मिथुन : राहु आणि केतु 2023 पर्यंत खूप चांगली साथ देणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. कामात मोठं यश मिळेल. आपली प्रतिमा खूप चांगली निर्माण होईल. मान सन्मान वाढेल. मोठं पद मिळणार आहे. हा कालावधी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला असेल. 

कर्क : ऑक्टोबर 2023 पर्यंतचा काळ अधिक चांगला आहे. त्यांना मोठा फायदा होईल. नोकरी मिळू शकते. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात चांगली संधी मिळेल. व्यवसायात मोठा फायदा होईल. आर्थिक वृद्धी होणार आहे. चांगला काळ असेल.