मुंबई : रविवारी 22 ऑगस्ट 2021 रोजी रक्षाबंधन आहे. सगळीकडे हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो. बहिण या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधते. ओवाळते. आणि या ओवाळणीत भाऊ बहिणीला खास गिफ्ट देतो. भाऊ आजच्या दिवशी काय गिफ्ट द्यायचं? याबाबत खूप विचार करत असतात. अशावेळी आपण चुकूनही हे गिफ्ट्स देऊ नका.
भावांनी आजच्या दिवशी चुकूनही आपल्या बहिणीला हे गिफ्ट देऊ नये. हे गिफ्ट्स दिल्यामुळे बहिणीच्या आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.
अनेकदा भाऊ रक्षाबंधनच्या सणाला (Raksha Bandhan 2021) आपल्या बहिणीला फोटो फ्रेम गिफ्ट करतात. अशुभ गोष्टी मानल्या जातात. असं केल्यामुळे त्या व्यक्तीला नकारात्मक विचार देतात. यामुळे रक्षाबंधनला चुकूनही काचेचं गिफ्ट देऊ नका. तसेच बहिणींना चाकूचा सेट देखील कधीच गिफ्ट करू नये. या सगळ्यागोष्टी कुटुंबात प्रतिकूलता निर्माण होते.
रक्षाबंधन असो वा सामान्य दिवस कधीच आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा रक्षाबंधनला बहिणींना रूमाल गिफ्ट करू नका. रूमाल गिफ्ट करणं हे निरोपाचं प्रतिक मानलं जातं. यामुळे कायमच एक अंतर निर्माण होतं. यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात कष्ट निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीने कायमच स्वतःकरता रूमाल खरेदी करावा.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना कपडे गिफ्ट करण्याची परंपरा आहे. हे केलं तर चांगलंच असतं. मात्र चुकूनही या रंगाचे कपडे बहिणीला गिफ्ट देऊ नका. उदाहरणार्थ कपडे. काळा रंग दुःख, कष्ट आणि अडचणी यांचं प्रतिक आहे. यामुळे सणाच्या दिवशी किंवा शुभ कार्याला कायमच काळ्या रंगाचे कपडे दूर ठेवावेत.
अनेक लोक रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींना घड्याळे भेट देतात. असे मानले जाते की घड्याळ जीवनात प्रगती थांबवते. घड्याळ कधीकधी थांबते किंवा खराब होते. जे वाईटाचे लक्षण मानले जाते. म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणींना घड्याळ भेट देऊ नका.
मुलींना त्यांच्या आवडीचे सँडल किंवा शूज मिळवायचे असतात ही एक सामान्य गोष्ट आहे. आपल्या बहिणींचा आनंद पाहण्याकरता भाऊ रक्षाबंधन 2021 ला या गोष्टी भेट देतात. असे मानले जाते की या गोष्टी विभक्त होण्याचे प्रतीक आहेत. त्यांना भेटवस्तू म्हणून दिल्याने भाऊ आणि बहिणीच्या नात्यात अंतर येते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना शूज आणि चप्पल कधीही भेट देऊ नये.