Ram Navami 2023 Lucky Zodiac Signs : मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम (Shri Ram) यांचा जन्मोत्सव मोठ्या थाट्यामाट्यात देशभरात साजरा केला जातो. शुक्ल पक्षाच्या (Shukla Paksha Chaitra month) नवव्या तिथीला श्री रामाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. देशभरातील मंदिरात आणि घरोघरी रामाची (#JaiShreeRam) पूजा अर्चा केली जाते. भगवान श्रीरामचा जन्म दिवस (Ram Navmi 2023)यंदा गुरुवारी 30 मार्च 2023 ला आहे. गुरुवार आणि त्यात ग्रहांचा अतिशय दुर्मिळ योग तयार झाला आहे. त्यामुळे रामनवमी काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.( astrology news)
राम नवमी 2023 शुभ योग संयोजन (Ram Navami 2023 Shub Yoga)
रामनवमीला सूर्य, बुध आणि गुरु मीन राशीत, शनी कुंभात, शुक्र आणि राहू मेष राशीत बसले आहेत. यामुळे मालव्य, केदार, हंस आणि महाभाग्य असे दुर्मिळ योग तयार होतं आहेत. यासोबतच सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, गुरु पुष्य योग आणि रवि योग यांचा संगम होणार आहे. (Ram Navami 2023 shubh yog guru pushya amrit siddhi and ravi yog 3 Zodiac Signs get money in marathi)
वृषभ (Aries)
ही रामनवमी या राशीच्या लोकांसाठी अनेक आनंददायी गोष्टी घेऊन आली आहे. शुभ योगामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रखडलेली काम मार्गी लागतील आणि प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तर गुतंवणुकीसाठी हा अतिशय शुभ काळ असणार आहे. चार शुभ योगांमुळे या राशीचं भविष्य चमकणार आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी चार संयोग धनलाभ घेऊन आला आहे. उत्पन्नाचे अनेक मार्ग सापडतील. समाजात मान सन्मान वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तूळ राशीच्या लोकांसाठीही हा काळ शुभ असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या काळात तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी रामनवमी भाग्यशाली ठरणार आहे. कर्जापासून मुक्ती मिळले आणि आर्थिक स्ठिती चांगली होणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडणार आहे. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी दूर होतील. या राशीच्या लोकांसाठी या चार संयोगामुळे अतिशय राजयोग काळ असणार आहे.
हेसुद्धा वाचा - Ram Navami 2023 Date : कधी आहे रामनवमी? यंदा अत्यंत दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
रामनवमीच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योगायोग, बदलणार 'या' राशींचे भाग्य!