Rangbhari Ekadashi 2023 puja muhurat in marathi : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. सर्वांना वेध लागले आहेत होलिका आणि रंगपंचमीचे...पण त्या आधी मार्च महिन्यात पहिला सण येत आहे तो एकादशीचा...ही एकादशी खूप खास आहे. यावेळी या एकादशीला खास योग जुळून आले आहेत. आमलकी एकादशीला अनेक ठिकाणी रंगभरी एकादशी म्हणून ओळखलं जातं. ही एकादशी नेमकी कधी आहे याबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे. तर ही कधी आहे, पूजा, शुभ मुर्हूत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत.
या एकादशीला आवळा वृक्ष, भगवान विष्णूच्या पूजेसोबत शिव-पार्वतीच्या पूजाला महत्त्व आहे. यादिवशी शंकर भगवानची पूजा केल्यास काही राशीच्या लोकांवर त्याची विशेष कृपा बरसणार आहे. (rangbhari ekadashi 2023 March 2 or 3 Know the exact date puja muhurat shubh yoga amalaki ekadashi these zodiac sign get money in marathi)
हिंदू पंचागनुसार रंगभरी एकादशी म्हणजे आमलकी एकादशी ही 02 मार्च 2023 ला सकाळी 6.39 वाजता सुरू होणार आहे. तर 3 मार्च 2023 रोजी सकाळी 9.12 वाजता ती समाप्त होणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, एकादशीचं व्रत आणि पूजा कधी करायची. तर हिंदू धर्मात कुठलीही गोष्ट ही उदयतिथी पाहून ठरवली जाते. जर एकादशीची उदयतिथी पाहिली तर ती 03 मार्च 2023 ला आहे. याचाच अर्थ 03 मार्च 2023 आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे.
या एकादशीला भगवान शंकर आणि भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी एकूण 43 शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे भक्तांसाठी ही सुर्वण संधी आहे.
सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 6.45 ते दुपारी 3.43 पर्यंत
सौभाग्य योग - सूर्योदयापासून संध्याकाळी 06:45 पर्यंत
शोभन योग - 06:45 पासून 4 तारखेला सकाळपर्यंत
या राशीच्या लोकांसाठी ही एकादशी खूप शुभ ठरणार आहे. त्यांना अचानक धनलाभ होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे. या राशीच्या लोकांची पगारवाढ होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी एकादशी भाग्यशाली ठरणार आहे. व्यवसायात मोठे मोठ करार होणार आहे त्यामुळे धनलाभ होणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि त्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल.
या राशीच्या लोकांचे अडकलेली कामं मार्गी लागतील. या एकादशीला तुमच्या नशीबात धनलाभ आहे. उद्योगपतींसाठी एकादशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नवीन नवीन कराराची संधी मिळणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)