79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग, 5 योगामुळे 'या' राशींना महालाभ

Mauni Amavasya 2024 Auspecious Yoga: या वर्षाची मौनी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा 79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना महालाभ होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 7, 2024, 03:56 PM IST
79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग, 5 योगामुळे 'या' राशींना महालाभ title=
Rare Coincidence of Mauni Amavasya After 79 Years 5 Yoga Benefit These zodiac Signs

Mauni Amavasya 2024 Auspecious Yoga: पौष महिन्यातील मौनी अमावस्या अतिशय शुभ मानली जाते. त्यात यंदा मौनी अमावस्येला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. येत्या शुक्रवारी 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या असून यादिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येला पितृदोष आणि सर्व समस्यांपासून मुक्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. यावर्षी मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग, विनायक,अमृत, हंस आणि मालव्य यांसह 5 शुभ संयोग जुळून येणार आहे.  (Rare Coincidence of Mauni Amavasya After 79 Years 5 Yoga Benefit These zodiac Signs)

मेष रास (Aries Zodiac) 

तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात प्रगतीची संधी असणार आहे. भौतिक संपत्तीत वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. शैक्षणिक कार्यात यश मिळणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ सिद्ध होणार आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. घरातील सदस्यांच्या सहकार्याने कामातील अडथळे दूर होणार आहेत. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळणार आहे. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होणार आहे. प्रेमसंबंधात गोडवा असणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Mauni Amavasya 2024 : मौनी अमावस्या कधी आहे? मातीची पणती ते हळदीचं स्वस्तिक, महिलांनी करावी 'ही' कामं

कर्क रास (Cancer Zodiac)   

मौन अमावस्येला जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होणार आहेत. नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल असणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)  

मौनी अमावस्येला तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार आहेत. मूल्यांकन किंवा बढतीची शक्यता आहे. करिअरमधील आव्हानांमधून तुम्हाला आराम मिळणार आहे. भौतिक सुखसोयींमध्ये वाढणार होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac)  

मुलांकडून चांगली बातमी मौनी अमावस्येला कानी पडणार आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. आर्थिक विवंचनेतून सुटका मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं यशस्वी होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण असणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)