राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी भाग्योदयाचा योग

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस   

Updated: Aug 27, 2020, 07:13 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी भाग्योदयाचा योग  title=
संग्रहित छायाचित्र

मेष : अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. स्वत:ची प्रतीमा सुधारण्याची संधी मिळेल. दिवस मन रमवणारा असेल. आजारपणा दूर होईल. 

वृषभ- कामात दिवसभर व्यग्र असाल. नोकरीच्या ठीकाणी इतरांकडून आदर मिळेल. मेहनत करा. अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. जीवनात काही महत्त्वाचे बदल घडून येतील. 

मिथुन- अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. आर्थिक परिस्थितीबाबत सातत्यानं विचार करा. आरोग्याची हेळसांड करु नका. 

कर्क- नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. दैनंदिन कामांमध्ये काही अडथळे येतील. त्यावर सहजपणे मात कराल. आरोग्याच्या बाबतीत काही चढ- उचार जाणवतील. झोप कमीच असेल. 

सिंह - कुटुंबात सुख- शांती असेल. कामाच्या ठिकाणी नवे करार करण्याची संधी मिळेल. एखाद्या दूरच्या गोष्टीवरच तुमचं जास्त लक्ष असेल. 

कन्या- कामाचा व्याप वाढलेला असेल. अनियमित कामांचा व्याप कमी होईल. मोठ्याचं सहकार्य मिळेल. आराम करण्यावरही तितकाच भर द्या. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठा फायदा होण्याची चिन्हं आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कोणावरही तुमच्या भावना लादू नका. 

वृश्चिक- व्यापारामध्ये फायदा होणार आहे. बदलीचा योग आहे. कोणतंही नवं काम सुरु करु नका. अविवाहितांसाठी आज काळजी घेण्याचा दिवस आहे. प्रेमसंबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

धनु- दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. अगदी सहजपणे कामं पूर्ण होतील प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जेवणात मसालेदार पदार्थांचा वापर टाळा. 

मकर- कोणतेही नवे करार आज करु नका. पैसे अडकतील. दिवसाची सुरुवात बेताची असेल. काही अडचणी समोर येतील. पण, कालांतरानं त्यावर तोडगा निघेल. 

 

कुंभ- आर्थिक चणचण कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादी शुभवार्ता मिळेल. कोणा एका खास निर्णयाच्या प्रतीक्षेत आहात तर धीरानं पुढे जा, शुभवार्ता मिळेल. 

मीन- व्यापारात फायदा आहे. पण, सावधगिरीनं पुढे जा. पैसे खर्च करताना विचार करा. थकवा दूर होईल. आरोग्याची काळजी घ्या.