Sagittarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे धनु राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Sagittarius April 2024 Horoscope dhanu Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)
एप्रिल महिना हा धनु राशीच्या लोकांसाठी आनंद, प्रगती आणि यश घेऊन आला आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा सांगतात की, एप्रिल महिन्यात धनु राशीची लोक आपल्या प्रिय व्यक्तीसोबत मजबूत नातेसंबंध आणि दृढ्य नातं बनवणार आहे. सकारात्मक लोकांना आपल्या आयुष्याकडे आकर्षित करणार आहेत. सामाजिक स्तरावर तुम्ही खूप जास्त सक्रीय राहणार आहात. लोकांचाही सहकार्य आणि प्रेम तुम्हाला लाभणार आहे. तुमचे संपर्क वाढणार आहे. घरात शुभ कार्य घडणार आहे.
नवीन व्यक्तीची एन्ट्री तुमच्या आयुष्यात होणार आहे. तुम्ही एखाद्या नात्याबद्दल वचनबद्ध होणार आहात. जोडीदारासोबत रोमाँटिक नात्याला अधिक मजबूत करणार आहात. इमोशनली तुम्ही समाधानी असणार आहात. या महिन्यात तुम्ही खूप अधिक पार्टीच्या मूडमध्ये असणार आहात.
मात्र एप्रिल महिन्यात तुमच्या प्रकृतीविषयी जागृत राहा. तुमच्या डाएटवर लक्ष द्या. लाइफस्टाइलवर लक्षकेंद्रीत करा. कुठल्या तरी व्यसनत गुंतण्यापासून लांब राहा. तुमचं वजन वाढणार आहे किंवा पाण्याशी सबंधित समस्या होऊ शकते.
कामाच्या ठिकाणी तुमचं सगळं छान असेल. पार्टनशीपमध्ये तुम्ही काम सुरु करु शकता. तुमचं स्वत:चं काम असेल तर त्यात नफा मिळणार आहे. जॉबमध्ये स्थिरता असेल. मोठं प्रकल्प किंवा मोठी संधी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुरस्कार किंवा बोनस मिळू शकतो.
आर्थिकदृष्ट्या एप्रिल महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. पैशा स्थिर राहणार असून तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो.
एकंदरीत एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप चांगला असून तुम्हाला आनंद, यश आणि प्रगती लाभणार आहे. या महिन्यात घरातील किंवा आजूबाजूच्या लहान मुलांना स्टेशनरी वस्तू नक्की द्या.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)