Sagittarius Horoscope 2024 : धनु राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Sagittarius Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष धनु राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

नेहा चौधरी | Updated: Dec 19, 2023, 10:32 AM IST
Sagittarius Horoscope 2024 : धनु राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य title=
Sagittarius yearly horoscope 2024 predictions Dhanu rashi know Dhanu rashifal in marathi

Dhanu Rashifal Yearly Predictions : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीवर गुरु ग्रहाची अधिपती आहे. गुरु हा वृद्धी, समृद्धी, ऐश्वर्य, ज्ञान आणि गूढ विषयांचा कारक मानल जातो. 1 जानेवारी 2024 पासून धनु राशीच्या पारगमन कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहता चढत्या घरात तुमच्या संक्रमण कुंडलीत मंगळ आणि सूर्य असणार आहे. जे लोकांसाठी खूप चांगले ठरणार आहे. कारण या दोन्ही गोष्टी तुम्हाला फायदा होणार आहे. तर मंगळ हा पाचव्या घराता स्वामी तर सूर्य देव नवव्या घराचा स्वामी असल्याने हा शुभ योग धनु राशीच्या कुंडलीत नवीन वर्षात तयार होतो आहे. तसंच शनिदेव तिसऱ्या भावात आणि राहू चौथ्या भावात असणार आहे. गुरु पाचव्या आणि चंद्र नवव्या घरात विराजमान असणार आहे. त्याशिवाय केतू कर्म घरात तर बुध आणि शुक्र 12 व्या घरात स्थित असणार आहे. अशा स्थितीत या वर्षी गुरु ग्रहही तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. तर केतू ग्रह तुम्हाला खूप चांगला लाभ तुम्हाला मिळणार आहे. (Sagittarius yearly horoscope 2024 predictions Dhanu rashi know Dhanu rashifal in marathi) 

धनु राशीच्या लोकांचा व्यवसाय 2024

2024 हे वर्ष नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. या वर्षी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदासोबत प्रगती होणार आहे. केतू तुम्हाला चांगला लाभ देणार आहे. पण कधी कधी राहु ग्रह तुम्हाला खूप मेहनत करायला लावणार आहे. काही प्रमाणात तुमची धावपळही होण्याची शक्यता आहे. तुम्ही खूप प्रवास देखील करु शकता. तसंच, या वर्षी नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम संधी आहे. 

धनु राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती 2024

2024 मध्ये तुमची आर्थिक स्थिती 2023 पेक्षा चांगली असणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे चांगले स्त्रोत मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत लाभणार आहे. नोकरीत चांगली पगारवाढ होणार आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. 

धनु राशीच्या लोकांचे करिअर आणि शिक्षण 2024

2024 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आहे. कारण गुरु पाचव्या घरात असल्यामुळे मे महिन्यापर्यंत तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश निश्चित करु शकणार आहात. स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 1 मे पूर्वी परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, त्यांना संधी मिळणार आहे. 

धनु राशीचे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध 2024

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ सिद्ध होणार आहे. यावर्षी कोणतीही अडचण तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे, त्यांना 1 मे पूर्वी तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे. 

धनु राशीच्या लोकांचे आरोग्य 2024

2024 मध्ये तुम्हाला आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या होणार नाही. त्याच वेळी, या वर्षी तुम्हाला जुन्या आजारापासून आराम मिळणार आहे. पण हो, थोडं बाहेरचं खाणं तुम्हाला टाळावं लागणार आहे. अन्यथा, काही महिन्यांत तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना होऊ शकते. 

धनु राशीसाठी उपाय 2024

मे नंतर, गुरु तुमच्या राशीच्या सहाव्या भावात असणार आहे. त्यामुळे तुम्ही गुरूशी संबंधित उपाय केल्यास तुम्हाला फायदा होईल. गुरुवारी मंदिरात हरभरा डाळ आणि केळी दान करणे फायद्याच ठरले. शिवाय तुम्ही पिवळ्या मिठाईचे दानही करु शकता. त्याशिवाय पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गोळा बांधून वर्षभर हातात बांधून ठेवा. तसंच अनावश्यक खर्च टाळा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)