Samsaptak Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात. सध्या गुरू आणि शुक्र ग्रहांमुळे समसप्तक राजयोग निर्माण झाला आहे. हा योग तब्बल 100 वर्षांनी निर्माण झाला आहे. समसप्तक राजयोगाचा सर्व राशीच्या लोकांवर थोड्याफार प्रमाणात परिणाम होणार आहे. मात्र 3 राशींच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना सर्व क्षेत्रात यश मिळणार आहे. कोणत्या आहे या लकी राशी जाणून घेऊयात. (Samsaptak Rajyoga after 100 years Jupiter and Venus will make these people rich)
या राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग शुभ परिणाम देणार आहे. शुक्र तुमच्या कुंडलीतील अकराव्या घरात आहे, तर गुरु पाचव्या घरात असल्याने तुम्हाला शुभ ठरणार आहे. तुम्हाला संततीचा आनंद मिळणार आहे. जर तुम्हाला मूल असेल तर त्याच्याबद्दल तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी मिळणार आहे. नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे योग आहेत.
समसप्तक राजयोग तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. शुक्र आणि गुरु तुमच्या राशीतून चतुर्थ स्थानी जात आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही मालमत्ता, नवीन घर किंवा वाहन खरेदीची योग जुळून आले आहेत. तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी आणि व्यवसायात हा राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. शुक्रदेवाच्या कृपेने नवीन वर्षात अविवाहित लोकांचं लग्न ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम दिसून येणार आहे. या काळात तुम्हाला आईची साथ मिळणार आहे.
समसप्तक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यशसोबत प्रगती घेऊन आला आहे. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभही तुम्हाला होणार आहे. मित्रपरिवाराकडून या काळात तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. गुरु तिसऱ्या घरात असल्याने बहीण भावाच्या नात्यात प्रेम वाढणार आहे. या काळात कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)