Samudrika Shastra : कानाचा आकार लांब असलेल्या व्यक्ती कशा असतात? जाणून घ्या

आज आपण कानांच्या टेक्सचरबद्दल जाणून घेणार आहोत. 

Updated: Jun 28, 2022, 10:24 AM IST
Samudrika Shastra : कानाचा आकार लांब असलेल्या व्यक्ती कशा असतात? जाणून घ्या title=

मुंबई : अनेक लोकांच्या जीवनात समुद्र शास्त्र किंवा समुद्र विज्ञान यांना खूप महत्त्व आहे. सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराच्या रचनेवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखता येतं. आज आपण कानांच्या टेक्सचरबद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांचे कान सामान्यपेक्षा जास्त लांब असतात किंवा काही लोकांच्या कानाचा खालचा भाग अधिक प्रमाणात मोठा असतो.

समुद्र शास्त्रानुसार, अशा आकाराचे कान असलेले लोक खूप हुशार आणि बुद्धीवा असतात. त्याचबरोबर ते त्यांच्या कामाबद्दल प्रामाणिक असून त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करतात.

कानाचा आकार लांब असलेले लोकं ज्या पद्धतीने आपला मुद्दा इतरांसमोर मांडतात, ते खूप चांगल्या पद्धतीने समोर येतं. त्यांच्या आयुष्यात पैशाची स्थितीही चांगली असते. हे लोक वेळ आणि बोलणं या दोन्ही बाबतीत खूप वक्तशीर असतात. परंतु जर कोणी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही तर त्यांना पटकन राग येतो.

ज्यांना समुद्र शास्त्राची माहिती नाही त्यांच्यासाठी, वैदिक परंपरेच्या भागामध्ये फेस रिडींग आणि संपूर्ण शरीराचं विश्लेषण यांचा समावेश होतो.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)