Shani Dev Remedies: अनेकांना शनिपिडेची भीती वाटत असते. त्यामुळे शनीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. नकारात्मक दृष्टी कोणालाच नको असते. यासाठी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपायही केले जातात. असे मानले जाते की शनिवारी शनिदेवाची पूजा केल्यास शनीदेव लवकर प्रसन्न होतो. मात्र, पूजा करताना कोणती खबरदारी घ्यावी हे लोकांना माहीत नसेत. असे न केल्यास त्यांना शनिदेवाची कृपा प्राप्त होत नाही.
शनिदेवाला तीळ, गूळ, खिचडी अर्पण करा. असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने शनीदेव लवकर प्रसन्न होतो आणि त्याची कृपा कायम राहते. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर आज शनिवारी या गोष्टी अर्पण करा.
लोक पूजेत अनेकदा तांब्याची भांडी वापरतात. देवपूजेच्या वेळी ही भांडी शुभ मानली जातात. मात्र, शनिदेवाची पूजा करताना चुकूनही तांब्याचे भांडे वापरु नका. तांब्याचा संबंध सूर्याशी असून तो शनिदेवाचा शत्रू मानला जातो. शनिदेवाच्या पूजेसाठी लोखंडी भांडी वापरा.
शनिदेवाची पूजा करताना पश्चिम दिशेला तोंड करावे. शनिदेवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानला जातो, त्यामुळे पूजाही याच दिशेला करावी. मात्र, पूजा करताना एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, ती म्हणजे कधीही समोर येऊन पूजा करु नका. म्हणजेच, तुमचा चेहरा त्यांच्या डोळ्यांच्या थेट संपर्कात नसावा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)