सूर्य गोचर 'या' राशीच्या लोकांचं उजळेल नशिब, प्रत्येक कामात असेल नशिबाची साथ

जाणून घ्या, तुम्हीही आहात का यात

Updated: Oct 15, 2022, 06:10 PM IST
सूर्य गोचर 'या' राशीच्या लोकांचं उजळेल नशिब, प्रत्येक कामात असेल नशिबाची साथ title=

मुंबई : सर्व ग्रह वेगवेगळ्या राशीमध्ये प्रवास करतात. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याच्या राशीतील बदलाला विशेष महत्त्व आहे आणि या बदलाचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो आणि त्यानंतर जवळपास एक महिना त्या राशीत राहतो. यावेळी दिवाळीच्या सुमारे एक आठवडा आधी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. तूळ राशीत सूर्याच्या प्रवेशाचा मीन राशीच्या लोकांवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.

सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे उच्च अधिकार्‍यांकडून प्रशंसा मिळू शकते. तुमच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे ऑफिसपासून घरापर्यंत तुमचा सामाजिक स्तरावर आदर वाढेल. ज्यामुळे तुमचे मनोबल आणि वैयक्तिक वैभव वाढेल. अधिकार्‍यांशी वाद घालू नका, कारण त्यांच्याशी वाद तुम्हाला अडचणीत आणू शकतात. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि तुमची चूक असेल तर ती स्वीकारा. निरर्थक गोष्टींवर वाद घालू नका, कधीकधी शांत राहणे चांगले.

सणासाठी तुम्ही स्वतःसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करू शकता. जवळच्या मित्राकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडून कपडे भेट दिले जाऊ शकतात. जीवनातील भेटवस्तू आणि आव्हानांचे आपण सहजतेने स्वागत करू आणि ही वृत्ती आपल्याला ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल. ध्येय साध्य करण्यासाठी, एका वेळी एक कार्य घ्या.

जर कोणाशी काही वाद झाला असेल तर तो विषय मनावर घेऊ नका. जर एखादी लहान व्यक्ती असेल तर त्याची चूक समजून घ्या आणि तुमचा मोठेपणा दाखवत त्याला माफ करा, मनात काहीही ठेवू नका. या दरम्यान सर्व प्रकारच्या समस्या, दु:ख विसरून स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचे शरीर आणि मन निरोगी असेल, तेव्हाच तुम्ही भविष्यातील काम चांगली करू शकाल. (sun transit 2022 pisces people luck shine due to surya rashi parivartan) 

या काळात तुम्हाला कामासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. सतत एकाच ठिकाणी काम केल्यानं पाठदुखी होऊ शकते, त्यामुळे मध्येच उठून मुद्रा बदलत राहा. आरोग्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. घरगुती उपाय केल्यास आजारांपासून मुक्ती मिळू शकते. दरम्यान, तुम्ही तुमच्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर देऊ शकाल. तुमचे यश त्यांचा पराभव असेल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)