शनी गोचर 2022 : या 2 राशींना करावा लागणार शनी प्रकोपाचा सामना! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

शनीने कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू झाली आहे. पण, याशिवाय 2 राशीच्या लोकांना शनीच्या प्रकोपाचाही सामना करावा लागणार आहे.

Updated: May 7, 2022, 04:49 PM IST
शनी गोचर 2022 : या 2 राशींना करावा लागणार शनी प्रकोपाचा सामना! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी title=

मुंबई : शनीने 29 एप्रिल 2022 रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. शनीच्या या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. या संक्रमणामुळे काही राशींना दिलासा मिळणार आहे तर काहींना हे संक्रमण त्रासदायक ठरणार आहे.

कुंभ राशीत शनीच्या प्रवेशाने मीन राशीत साडे साती सुरू झाली आहे. तर, धनु राशीची साडे साती संपली आहे. पण, आणखी अशा 2 राशी आहेत ज्यांच्यावर शनीचा प्रकोप होणार आहे.

ज्योतिष शास्त्रात शनीला कर्माचा दाता असल्याचे म्हटले आहे. शनी कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असेल अशा लोकांच्या साडेसाती आणि धैय्याचा वाईट परिणाम होत नाही. 

त्यामुळे साडेसाती आणि धैय्याच्या काळात लोकांनी आपल्या कर्माकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांनी असहाय्य, महिला, वृद्ध यांचा अपमान करू नये. या लोकांना शक्य तितकी मदत केली पाहिजे.

या दोन राशींवर होणार प्रकोप

कर्क - शनीचे संक्रमण होताच कर्क राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा सुरू झाली आहे. ते अडीच वर्षे चालेल. म्हणजेच कर्क राशीच्या लोकांवर शनीची अडीच वर्षे बारकाईने नजर असेल. त्यांना जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. करिअर, शिक्षणात अडचणी येऊ शकतात. धनहानी होऊ शकते. खर्च वाढू शकतो. कोणताही आजार होऊ शकतो. त्यामुळे या सर्व बाबतीत काळजी घ्या.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांवरही शनीची धैय्या सुरू झाली आहे. त्यामुळे येणारी अडीच वर्षे या लोकांसाठी कठीण जाणार आहेत. शनीच्या धैय्या आणि साडेसातीमुळे धन, आरोग्य आणि प्रतिष्ठा हानी होते. याशिवाय प्रगतीत अडथळे येतात आणि नात्यात समस्या निर्माण होतात. बोलण्यातून तुम्हाला राग येईल. ही वेळ संयमाने घेणे चांगले