Sun Saturn Conjuction 2024: ज्योतिष शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. नवग्रहातील सूर्य आणि शनि हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह मानले जातात. ग्रहांचा राजा सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. याशिवाय शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. काही दिवसांपूर्वी या दोन्ही ग्रहांची युती झाली आहे.
ग्रहांचा राजा सूर्याने 13 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. मुख्य म्हणजे शनी ग्रह या ठिकाणी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग झाला आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे कोणत्या राशींचं भाग्य उडळू शकणार आहे.
या राशीसाठी सूर्य आणि शनीचा संयोग चमत्कारापेक्षा कमी नाहीये. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. इतर कंपन्यांकडूनही नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तुम्ही तुमच्या करिअरची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवाल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. फक्त आपल्या जीवनशैलीची काळजी घ्या.
सूर्य आणि शनीचा संयोग दशम भावात झाला आहे. तुमचं परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे व्यावसायिक जीवन चांगले राहणार आहे. नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी तुमचा समन्वय चांगला राहणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील. यासोबतच परदेशात बिझनेस करणाऱ्या लोकांना खूप फायदा मिळू शकतो. तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो.
या राशीमध्ये सूर्य आणि शनीचा संयोग सहाव्या भावात होत आहे. या राशीच्या लोकांना गुप्त स्त्रोतांकडून अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. समर्पणाने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )