Saturn-Venus Yuti: नव्या वर्षात शनी-शुक्राची युती देणार लाभ; 'या' राशींना पद-पैसा मिळण्याची शक्यता

Saturn And Venus Conjunction 2024: 2004 वर्षात 7 मार्च रोजी सकाळी 10:55 वाजता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 21, 2023, 10:55 AM IST
Saturn-Venus Yuti: नव्या वर्षात शनी-शुक्राची युती देणार लाभ; 'या' राशींना पद-पैसा मिळण्याची शक्यता title=

Saturn And Venus Conjunction 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. यामध्ये शनी देव सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह आहे. शनीबद्दल बोलायचं झालं तर तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत तो 2024 साली आपली राशी बदलणार नाही. या काळात शनीचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग येणार आहे. 

2004 वर्षात 7 मार्च रोजी सकाळी 10:55 वाजता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. ज्योतिषशास्त्रात दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत असं म्हटलं जातं. 2024 मध्ये काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच येऊ शकतो. जाणून घेऊया शुक्र आणि शनीच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. यावेळी नशीब पूर्ण साथ देणार आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. कला आणि संवाद क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते. शेअर्समध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. यासोबतच परदेशात अभ्यासासाठी अर्ज करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 

तूळ रास (Tula Zodiac)

या राशीमध्ये शुक्र आणि मंगळाचा संयोग होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना 2024 मध्ये आयुष्यात खूप समाधान मिळू शकते. यावेळी तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. गुंतवणुकीमुळे फायदाही होऊ शकतो. करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये चांगले परिणाम मिळवू शकता. परदेशातूनही नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. 

मकर रास (Makar Zodiac)

या राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग दुसऱ्या भावात होत आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा सन्मान मिळेल. परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )