Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता

Budh Uday In Dhanu: बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 21, 2023, 09:40 AM IST
Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता title=

Budh Uday In Dhanu: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह उदय आणि अस्त होतात. यामध्ये येत्या काळात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणी, संवाद आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. 

ज्यावेळी बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

बुधाचा उदय तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमचा व्यवसाय आणि मालमत्ता वाढेल आणि तुम्ही यावेळी नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी बॉस तुमची प्रशंसा करू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात इतरांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे. अपेक्षित पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते. तुम्ही छोटा किंवा मोठा प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ आनंदाचा राहणार आहे. तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता.

तूळ रास (Tula Zodiac)

बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. ज्या लोकांचे काम आणि व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत त्यांना या काळात चांगले लाभ मिळू शकतात. तुमची बँक बॅलन्सही वाढेल आणि तुमची कमाई वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )