Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा

Shani Asta 2024 : फेब्रुवारी महिन्यात शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. काही राशींसाठी शनि अस्त भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्यामुळे कुठलाल राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या.   

नेहा चौधरी | Updated: Jan 24, 2024, 07:55 AM IST
Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा title=
Shani Asta 2024 on february 11 After 18 days Saturn curve on these zodiac signs Along with loss of money there will be hindrance in every work

Saturn Sets In Aquarius :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत अडीच वर्ष विराजमान राहणार आहे. पण मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत असताना तो वेळोवेळी आपली स्थिती बदलणार आहे. त्यानुसार 11 फेब्रुवारी 2024 ला सायंकाळी 6:56 वाजता शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. शनीच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. तर काही राशीच्या राशींना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. 26 मार्चला सकाळी 5.20 वाजता शनि कुंभ राशीत उदय होणार आहे. शनीच्या अस्तामुळे काही राशींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.  (Shani Asta 2024 on february 11 After 18 days Saturn curve on these zodiac signs Along with loss of money there will be hindrance in every work)

मेष रास (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या राशीत शनि अकराव्या भावात अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होणार आहे. तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडथळ्यांचा निर्माण होणार आहे. यासोबतच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात अनेक प्रकारची आव्हाने उभी राहणार आहे. यासोबतच करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर समाधानात थोडीशी घट होईल. तुम्ही तुमच्या कामात समाधानी नसणार आहात. यासोबतच व्यवसायाच्या क्षेत्रात काही समस्या उद्भवणार आहे. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

कुंभ राशीमध्ये शनीच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण होणार आहे. या राशीमध्ये शनि दहाव्या भावात स्थित असणार आहे. अशा परिस्थितीत करिअर क्षेत्रात नोकरीत चढ-उतार पाहिला मिळणार आहे. करिअरबाबत थोडे चिंता वाढणार आहे. सहकारी तुमचा विरोध करतील, त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच व्यवसायाबाबतही थोडे सावध राहवं लागणार आहे. स्पर्धकांमध्ये कठीण स्पर्धा असणार आहे. त्यामुळे व्यवसायासाठी योग्य रणनीती बनवणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होणार आहे.

कन्या रास (Virgo Zodiac)   

या राशीमध्ये शनि सहाव्या भावात अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी नोकरी आणि व्यवसायात थोडे सावध राहवं लागणार आहे. तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असणार आहात. नोकरदारांना थोड्या कामासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे. नोकरीत तुम्हाला थोडे दडपण जाणवणार आहे. यासोबतच जीवनात काही अडथळे येणार आहेत. व्यवसायिकांना नफा मिळवणं कठीण जाणार आहे. कुटुंबात काही कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तणावाचा सामना करावा लागणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)