Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र

Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.

नेहा चौधरी | Updated: May 19, 2023, 06:30 AM IST
Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र  title=
Shani Jayanti 2023 date time puja muhurat Shani mantra and 5 shubh yog in marathi

Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि जयंतीला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्म झाला होता. यंदाची शनि जयंती अतिशय खास आहे. या दिवशी पाच मोठे राजयोग जुळून आले आहेत. त्यामुळे यंदाची शनि जयंती अतिशय भाग्यशाली आणि फायदेशीर ठरणार आहे. या दिवशी शनि प्रकोप कमी करण्यासाठी खास उपाय केल्यास फायदा होतो, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात. पंचांगानुसार वर्षातून दोन वेळा शनि जयंती येते. एक वैशाख आणि दुसरी ज्येष्ठ महिन्यात. त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील शनि जयंती कधी आहे ते जाणून घेऊयात...

शनि जयंती 2023 (Shani Jayanti 2023 Date) 

पंचांगानुसार शनिदेवाची जयंती ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला साजरी करण्यात येते. तर या महिन्यात अमावस्येसा शुक्रवारी 19 मे 2023 ला असल्याने या दिवशी शनि जयंती आहे. पण हो दक्षिण भारतात वैशाख महिन्याच्या 20 एप्रिल 2023 ला शनि जयंती पाळली जाणार आहे.  धार्मिक ग्रथांनुसार या दिवशी सूर्य आणि सावलीच्या संयोगामुळे शनिदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे. (Shani Jayanti 2023 date time puja muhurat Shani mantra and 5 shubh yog in marathi )

ज्येष्ठ शनि जयंती 2023 मुहूर्त  (Shani Jayanti 2023 Muhurat)

शनि जयंती - शुक्रवार 19 मे 2023 

ज्येष्ठ अमावस्या तिथी सुरू होईल - 18 मे रात्री 09:42 वाजता
ज्येष्ठ अमावस्या तिथी समाप्त होईल - 19 मे रात्री 09:22 वाजता

शनि जयंती पूजेची वेळ

सकाळची वेळ - 07.11 वाजेपासून - 10.35 वाजेपर्यंत (19 मे 2023)
दुपारचा मुहूर्त - 12.18 वाजेपासून - 02.00 वाजेपर्यंत (19 मे 2023)
संध्याकाळची वेळ - 05.25 वाजेपासून - 07.07 वाजेपर्यंत (19 मे 2023)

 
शनि जयंती पूजा विधी (Shani Dev Puja)

ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ केल्यानंतर पूजा करा.

शनि मंदिरात जाऊन मूर्तीवर तेल, फुलं आणि प्रसाद अर्पण करा. 

त्याशिवाय उडदाची डाळ आणि काळे तीळ अर्पण करा. 

त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनि चालिसेचं पठण करा.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शनिदेव मंत्र (Shani Jayanti 2023 Shani Mantra) 

1. बीज मंत्र- 
 
ॐ शं शनैश्चराय नम:
 
2. शनि का वेदोक्त मंत्र- 
 
ॐ शमाग्निभि: करच्छन्न: स्तपंत सूर्य शंवातोवा त्वरपा अपास्निधा:

 3. श्री शनि व्यासवि‍रचित मंत्र-

ॐ नीलांजन समाभासम्। रविपुत्रम यमाग्रजम्।
छाया मार्तण्डसंभूतम। तम् नमामि शनैश्चरम्।।

4. शनिचर पुराणोक्त मंत्र-   
 
सूर्यपुत्रो दीर्घेदेही विशालाक्ष: शिवप्रिय: द 
मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:
 
5. शनि स्तोत्र- 
 
नमस्ते कोणसंस्‍थाचं पिंगलाय नमो एक स्तुते
नमस्ते बभ्रूरूपाय कृष्णाय च नमो ए स्तुत
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो
नमस्ते मंदसज्ञाय शनैश्चर नमो ए स्तुते
प्रसाद कुरू देवेश दिनस्य प्रणतस्य च
कोषस्थह्म पिंगलो बभ्रूकृष्णौ रौदोए न्तको यम:
सौरी शनैश्चरो मंद: पिप्लदेन संस्तुत:
एतानि दश नामामी प्रातरुत्थाय ए पठेत्
शनैश्चरकृता पीडा न कदचित् भविष्यति
 
6.  तंत्रोक्त मंत्र - 
 
ॐ प्रां. प्रीं. प्रौ. स: शनैश्चराय नम:।

शनि जयंतीला शुभ संयोग

यावेळी शनि जयंतीला वट सावित्रीचे व्रत पाळलं जाणार आहे. त्याशिवाय यंदा शनि जयंतीला पाच मोठे योग जुळून आले आहेत. शोभन योग, गजकेसरी योग, बुधादित्य योग, वाशी योग आणि सनफा योग तयार होतं आहेत. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)