Shani Mangal Shadashtak Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, मंगळाला ग्रहांच्या सेनापतीचा दर्जा देण्यात आलाय. लवकरच मंगळ ग्रह गोचर करणार आहे. यावेळी मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान मंगळ ग्रहाच्या राशीच्या या बदलामुळे षडाष्टक योग तयार होणार आहे. शनि आणि मंगळाच्या युतीमुळे निर्माण झालेला सर्वात अशुभ योग मानला जातो. शनि आणि मंगळ हे शत्रू ग्रह आहेत.
षडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या राशींवर याचा विपरीत परिणाम होतो, त्या राशींच्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो. मंगळ गोचरमुळे तयार होणारा षडाष्टक योग 4 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. पाहूयात या 4 राशी कोणत्या आहेत.
मंगळ गोचरमुळे तयार होणाऱ्या या षडाष्टक योगाने कर्क राशीच्या लोकांना त्रास होण्याची चिन्ह आहेत. या राशीच्या लोकांची धनहानी होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत होणारी उधळपट्टी थांबवली आहे. जर तुमचा कोणाशी वाद असेल तर तो मिटवून टाका. तसंच कोणत्या वादात सापडणार नाही याची काळजी घ्या. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी. अन्यथा गुंतवणूक करार तोट्यात जाण्याची शक्यता आहे.
या षडाष्टक योगामुळे सिंह राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. घरात किंवा मित्रांसोबत वाद होणार नाहीत याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तुमच्या करिअरमध्ये अनेक आव्हानं उभी राहू शकतात. तुम्ही करत असलेल्या मोठ्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अवांछित प्रवास त्रासदायक ठरण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग त्रासदायक ठरणार आहे. यामुळे या राशींच्या व्यक्तींच्या खाजगी आयुष्यामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नोकरी-व्यवसायात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक स्थिती बिकट राहणार असून वायफळ खर्च होऊ शकतात. प्रेमसंबंधातील नात्यामध्ये वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा अशुभ योग धनू राशीच्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरणार आहे. या काळामध्ये कोणालाही कर्ज देऊ नका. कोणत्याही ठिकाणी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करू नये. हा काळ तुमच्यासाठी योग्य नाही, त्यामुळे नवीन नोकरी सुरू करण्याचा विचारही करू नका. तुमच्या आरोग्याबाबत अधिक सावध रहा.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )