Shardiya Navratri 4th Day 2023 : शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस हा माता शक्तीच्या चौथं रुप म्हणजे माता कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची चौथी माळही कुष्मांडा देवीला समर्पित असते. या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केलं होतं असं म्हणतात. या देवीला पिवळा रंग आवडतो ती सिंहावर स्वार असून तिला आठ हात आहे असं तिचं रुप आहे. तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा असते. तर आठव्या हातात. सर्व सिद्धी आणि निधीची जपमाळ पाहिला मिळते.मालपु्आ हे या देवीचं आवडतं नैवेद्य आहे. माता कुष्मांडाची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया. (shardiya navratri 2023 day 4 maa kushmanda shubh muhurat puja vidhi bhog mantra and navratri 4th day colors Wednesday)
बुधवारचा गडद निळा रंग असणार आहे. केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलांची माळ
कुष्मांडा देवीच्या पूजेत कुंकू, तांदूळ, सुपारीची पाने, केशर आणि श्रृंगार इत्यादी गोष्टींचा अपर्ण करा. याचबरोबर पांढरा भोपळा किंवा कुम्हारा असल्यास तो देवीला अतिशय प्रिय आहे. नंतर दुर्गा चालिसा पाठ करुन तुपाचा किंवा कापूर लावून देवी कुष्मांडाची आरती संपन्न करा. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुलं, जास्वंद किंवा गुलाबाचं फूल आवर्जुन अर्पण करावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले गेलं आहे. कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास ती प्रसन्न होते. यामध्ये दही, साखर आणि फुटाण्याचा समावेश तुम्ही करु शकता.
देवी कुष्मांडा तिच्या भक्तांना रोग, दुःख आणि विनाशापासून मुक्त करते, अशी मान्यता आहे. ती भक्तांना कीर्ती, सामर्थ्य आणि बुद्धी प्रदान करते असं म्हणतात.
ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
या देवी सर्वभूतेषु माँ कृष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
किंवा
"या देवी सर्वभूतेषु मां कुष्मांडा रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:"
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 202/7
|
VS |
ITA
178(20 ov)
|
| England beat Italy by 24 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 160/9
|
VS |
AFG
162/5(19.2 ov)
|
| Afghanistan beat United Arab Emirates by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.