अर्जुन पुरस्कार घेताना शिखर धवनचा 'गब्बर स्वॅग', पाहा व्हिडीओ

राष्ट्रपती भवनात शनिवारी संध्याकाळी शिखर धवनच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. 

Updated: Nov 13, 2021, 08:25 PM IST
अर्जुन पुरस्कार घेताना शिखर धवनचा 'गब्बर स्वॅग', पाहा व्हिडीओ  title=

नवी दिल्ली: 12 खेळाडूंना खेलरत्न तर 35 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. 

राष्ट्रपती भवनात शनिवारी संध्याकाळी शिखर धवनच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. यादरम्यान टीम इंडियाचा क्रिकेटर शिखर धवनने आपल्या गब्बर स्टाईलनं चाहत्यांची मन जिंकली आहेत. गब्बरचा अर्जुन पुरस्कार घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. 

 शिखर धवन अर्जुन पुरस्कार घेण्य़ासाठी आल्यानंतर राष्ट्रपती भवनात टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. शिखर धवन ज्या रुबाबात अर्जुन पुरस्कार घेण्यासाठी आला त्याची चर्चा होत आहे. गब्बरसह 34 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहिया, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन, अनुभवी गोलकीपर श्रीजेश पीआर, याशिवाय अवनी लेखरा, सुमित अंतील, प्रमोद भगत, मनीष नरवाल, मिताली राज आणि भारतीय हॉकी टीमचे कर्णधार सुनील क्षीरसागर यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.