Managalagaur 2023 : मंगळागौर साजरी करण्यामागचं हे खास कारण अनेकांना माहीत नाही, वाचून वाटेल आश्चर्य

Managala Gauri Vrat : श्रावण महिना लागला की नवविवाहित मुलींना माहेरीच ओढ लागते. श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत साजरा करतात. आज निज श्रावणातील पहिलं मंगळागौरीचं व्रत आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 22, 2023, 07:15 AM IST
Managalagaur 2023 : मंगळागौर साजरी करण्यामागचं हे खास कारण अनेकांना माहीत नाही, वाचून वाटेल आश्चर्य title=
shravan mangla gauri vrat 2023 tithi puja rituals manglagaur information in marathi

Managala Gauri Vrat : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील पहिलं मंगळागौरी व्रत (Mangala Gauri Vrat 2023) आज आहे. श्रावणात मंगळागौरी पूजनाला (Mangala Gauri Vrat Puja Vidhi) अतिशय महत्त्व आहे. या दिवशी विवाहित महिला मंगळागौरीची पूजा करतात. या दिवशी महिला शंकरासोबत (Lord Shiva) देवी पार्वतीचीही (Mata Parvati) पूजा करण्याची परंपरा आहे. पण हे व्रत का करतात या आहे यामागील कारणं हे अनेक महिलांना माहिती नाही. (shravan mangla gauri vrat 2023 tithi puja rituals manglagaur information in marathi)

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित पहिली पाच वर्षे हा सण साजरा करते. पाच वर्षांनंतर या व्रताचं उद्यापन करण्यात येतं. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण एकत्रितपणे साजरा केला जातो. पूजा झाल्यावर रात्री जागरण केलं जातं. मंगळागौरीची पूजा नक्की काय असते, मंगळागौरी का पूजली जाते? याचं उद्यापन कसं होतं? मंगळागौरीची कथा काय आहे?मंगळागौरीच्या पूजेचा विधी काय असतो? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

मंगळागौरी व्रत तिथी 2023

पहिला मंगळवार- 22 ऑगस्ट 2023
दुसरा मंगळवार – 29 ऑगस्ट 2023
तीसरा मंगळवार – 5 सप्टेंबर 2023
चौथा मंगळवार – 12 सप्टेंबर 2023

मंगळागौरीचं व्रत कसं करतात ?

या दिवशी सकाळी उठून आंघोळ करुन सोवळं नेसून विघ्नहर्त्याची पूजा केली जाते. त्यानंतर लग्नात नवविवाहितेला मिळालेली अन्नपूर्णेची मूर्तीची आणि शिवपिंडाची पूजा केली जाते. त्यानंतर कणकेचे किंवा पुरणाचे दिवे लावून आरास केली जाते. त्यानंतर अन्नपूर्णा, भगवान शंकर आणि मंगलागौरीचं आवाहन करण्यात येतं. 

देवीला विविध फुलांची आरास केली जाते. तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण केली जाते. नंतर मग एकत्र बसून मंगळागौरीची कथेचे पठण होतं. कथा वाचून झाल्यानंतर 16 दिवे लावून महानैवेद्य लावले जातात. 

का करतात मंगळागौरीची पूजा ?

श्रावणात मंगळागौरी पूजा का केली जाते तर, पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. तिचे प्रत्येक श्रावणी मंगळवारी पूजन केले जाते.

मंगळागौरी पूजनाचं महत्व

नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात म्हणजेच पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण व्हावे, अखंड सौभाग्यप्राप्ती आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. 

मंगळागौरीचे पारंपरिक खेळ (Manglagaur Sports)

मंगळागौरीचे पारंपरिक पद्धतीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित केले जाताय. यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. यामध्ये जवळपास 110 खेळांचा समावेश आहे. बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी,साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, दंड फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, केरसुणी फुगडी, जाते फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी किंवा बैठी फुगडी, कासव फुगडी, पाट फुगडी, लोळण फुगडी, लाटणे फुगडी आणि फुलपाखरू फुगडी कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, भुई फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात.

पूर्वीच्या काळात महिलांना विरंगुळा आणि एकत्र येण्यासाठी हे सण साजरा करण्यात येतं होते. आजही धावपळीच्या जगात महिला आणि नातेवाईकांनी एकत्र येतं शरीराला व्यायाम, मनाला चपळता, आनंद आणि चैतन्य देणारे हे खेळ आजही करणे गरजेचं आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )