बाप्पांचं आज आगमन, प्राणप्रतिष्ठेसाठी हा आहे शुभ मुहुर्त

एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता आणि सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचं आगमन

Updated: Sep 2, 2019, 09:02 AM IST
बाप्पांचं आज आगमन, प्राणप्रतिष्ठेसाठी हा आहे शुभ मुहुर्त title=

मुंबई : एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता आणि सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचं आगमन आज होत आहे. देवतांमध्ये अग्रपुजेचा मानकरी बाप्पांवर अनेक जणांची श्रद्धा आहे. आज भक्तीभावाने वाजत गाजत बाप्पांचं आगमन घरोघरी आणि मंडळांमध्ये होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचं आगमन झाल्यानंतर योग्य वेळी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. 

बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवताच्या रुपात गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी सकाळी 9 वाजून 1 मिनिटांपासून सुरु होते. दुपारी 11:04 वाजेपासून ते 1:37 वाजेपर्यंत बाप्प्यांची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. 2 तास 32 मिनिटांच्या या काळात गणेशाची पूजा केली पाहिजे.

अभिजित मुहूर्त हा गणेश पूजनासाठी सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे 11.05 पासून ते 1.36 पर्यंत प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. यानंतर मोदकांचा नैवेद्य दाखवा. पुस्तकांचं पूजन करा. त्यानंतर सौभाग्यवती महिलांनी हरतालिका आणि गणेश चतुर्थीचा उपवास सोडावा.