मुंबई : कुंडलीतील ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा नकळत प्रभाव आपल्या राशीवर होत असतो. भौतिक सुखांचा दाता म्हणून शुक्र ग्रहाची ओळख आहे. 29 जानेवारीपासून तो दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राचा धनु राशीमधील प्रवेश कोणत्या राशीसाठी फायद्याचा असणार आहे याबाबत आज जाणून घेऊया.
शुक्र ग्रहाचा धनु राशीमध्ये प्रवेश होणार आहे. हा बदल 3 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. गुरूच्या राशीत 23 दिवस धनु राशीत राहून शुक्र या राशीच्या लोकांना खूप फायदा देणार आहे.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. धनलाभ होऊ शकतो. प्रेमासाठी वेळ चांगला आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो.
वृषभ : या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांचा खूप फायदा होईल. प्रवास घडू शकतात आणि ते फायदेशीर देखील सिद्ध होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. घरातही आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन : या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप चांगला असणार आहे. हा काळ सन्मान आणि भौतिक सुख मिळेल. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी मिळेल. खर्चाकडे लक्ष द्या.
कुंभ : या राशीच्या लोकांना मोठा लाभ होणर आहे. व्यवसाय असो किंवा नोकरी दोन्हीमध्ये उत्तम यश मिळेल. तुम्हाला पैसा आणि सन्मान मिळेल. हा काळ प्रत्येक कामात यश देईल.
(Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)