Shukraditya Rajyog: 18 महिन्यांनी शुक्र-सूर्य बनवणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात यशस्वी

Venus And Sun Ki Yuti: 13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य आपल्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 24 एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 10, 2024, 10:35 AM IST
Shukraditya Rajyog: 18 महिन्यांनी शुक्र-सूर्य बनवणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात यशस्वी title=

Venus And Sun Ki Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या संयोगाने राजयोग तयार होतात. यापैकी काही राजयोग हे शुभ तर काही अशुभ असतात. अशा राजयोगांचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश आणि जगावर होतो. आगामी काळात असाच एक राजयोग तयार होणार आहे. 

13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य आपल्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 24 एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचे नशीब पालटणार आहे. जाणून घेऊया या राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे. 

तूळ रास (Tula Zodiac)

शुक्रादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. यावेळी अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला भागीदारी व्यवसायात नफा मिळेल. अडकलेले पैसे मिळून तुमच्या अनेक योजना पूर्ण होतील. 

सिंह रास (Leo Zodiac)

शुक्रादित्य राजयोग तयार झाल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुमच्या मनात सकारात्मक विचार वाढतील. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. यावेळी तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. 

मेष रास (Aries Zodiac)

शुक्रादित्य राजयोगाच्या तयारीने सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुमच्या मनात सकारात्मक विचार वाढतील. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यावेळी तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )