Friday Upay For Money in Marathi : आपल्या हातात पैसा नसेल तर बैचेन होते. हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस महत्वाचा आहे. देवी लक्ष्मीचा हा दिवस ओळखला जातो. म्हणूनच हा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. ( Shukrawar Upay) आज शुक्रवार आहे. त्यामुळे देवीची तुमच्यावर कृपा राहावी, असे वाटत असेल तर तुम्ही काही उपाय करणे गरजेचे आहे. या उपायाने तुमच्या हातात पैसाच पैसा येईल.(Shukrawar Upay and Lakshmi Puja Upay )
अनेकांचे स्वप्न असते श्रीमंत होण्याचे. श्रीमंत झाल्यानंतर जगातील सर्व सुख प्राप्त करता येते हे स्वप्न असते. म्हणूनच लोक श्रीमंत होण्यासाठी खूप परिश्रम करतात. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भरपूर संपत्ती आणि धन दौलत मिळविण्यासाठी शुक्रवार हा विशेष दिवस आहे. जर तुम्हीही शुक्रवारी हा उपाय केला तर माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वावर करेल आणि तुम्हची आर्थिक तंगी कमी होण्यास मदत होईल.
श्रीसूक्तचे पठण : आज शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण करा. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. यामुळे काय होईल तर भरपूर संपत्ती मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. शक्य असल्यास शुक्रवारी व्रत करावे. सकाळी स्ना केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे. असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.
कमळाचे फूल आणि कौडी अर्पण करा : माता लक्ष्मीच्या कृपा राहण्यासाठी हा उपाय करणे खूप महत्वाचे आहे. लक्ष्मीा प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी त्यांची पूजा करा. पूजेत कमळाचे फूल, कौडी अर्पण करा. मंदिरात गेल्यावरही या वस्तू अर्पण करा. असे केल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि तुमची चिंता मिटते.
मिठाई आणि खीर अर्पण करा : लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सारख मिठाई आणि खीर अर्पण करा. शुक्रवारी देवीच्या पूजेत तिला साखर आणि खीर असेल तर देवी प्रसन्न होते. यासोबतच स्फटिक किंवा कमळाच्या माळाने लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने हातात पैसा लवकर येतो.
देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. मात्र, तुमची एक चूक भारी पडू शकते. त्यामुळे लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी काही नियम पाळावे लागतील. ज्या घरात काही गोष्टींचे विशेष पालन केले जाते, त्याच घरात माता लक्ष्मीचा वास करते. यासाठी घरातील मंदिर ईशान्य कोपऱ्यात असणे आवश्यक आहे. यासोबतच पूर्व दिशेला बसून लक्ष्मीची पूजा करावी. तसेच मंदिराच्या शेजारी स्वयंपाकघर किंवा शौचालय असू नये हे लक्षात ठेवा. याशिवाय मंदिरात नेहमी स्वच्छता असावी. त्यापेक्षा संपूर्ण घरात स्वच्छता ठेवा. अशा घरात माता लक्ष्मी वास करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)