सोमवती अमावस्येला चंद्र असणार शक्तीशाली; रात्री तमालपत्राचा 'हा' उपाय करेल तुम्हाला श्रीमंत

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते. आज संध्याकाळी चंद्र सर्वाधिक शक्तीशाली असतो असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

नेहा चौधरी | Updated: Sep 2, 2024, 02:51 PM IST
सोमवती अमावस्येला चंद्र असणार शक्तीशाली; रात्री तमालपत्राचा 'हा' उपाय करेल तुम्हाला श्रीमंत  title=
Somvati Amavasya in the evening remedy of bay leaves will make you rich

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या, दर्श अमावस्या आणि पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. वर्षातील 12 अमावस्येपैकी सोमवती अमावस्या अतिशय शुभ मानली जाते. महाराष्ट्रात पिठोरी अमावस्येला मातृदिन साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवती अमावस्येची संध्याकाळी चंद्र अतिशय प्रभावशाली असतो. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवती अमावस्येला रात्री दोन सेकंदाचा तमालपत्राचा उपाय भाग्यशाली ठरतो, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात. (Somvati Amavasya in the evening remedy of bay leaves will make you rich)

तमालपत्राचा 'हा' उपाय करेल तुम्हाला श्रीमंत!

प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक समस्या असते. अशात अनेक जण यातून मार्ग काढण्यासाठी ज्योतिषशास्त्रातही मार्ग शोधतात. अशात सोमवती अमावस्येला तमालपत्राचा उपाय फलदायी मानला जातो. सोमवती अमावस्येला पितरांचा आशिर्वादासह यंदा महादेवाचा कृपा बरसणार आहे. 

2 सप्टेंबरला चंद्र सर्वाधिक शक्तिशाली असणार आहे. त्यामुळे एक अखंड असं न तुटलेलं तमालपत्र घ्या. आता त्यावर हिरवा, लाल किंवा निळा रंगाचा पेनने कोड नंबर 945925 हे लिहा. आता दुसऱ्या बाजूला पैसे आणि तुमचे नाव लिहा. 
आता हे तमालपत्र हातात धरा आणि स्वत:ला भरपूर पैसे मिळाल्याची आणि श्रीमंत होण्याची इच्छा प्रार्थना करा. आता हे तमालपत्र जाळून टाका आणि उरलेली राख तुमच्या घराबाहेर फुंकून टाका.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@my_little_happiness09)

चौमुखी दिवा लावा!

याशिवाय सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी तुपाचे चौमुखी दिवा लावून भगवान विष्णूची पूजा करा. त्याशिवाय तुळशीच्या रोपाला 108 वेळा प्रदक्षिणा घाला. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय केल्यास आर्थिक स्थिती सुधारते अशी मान्यता आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)