आजचे राशीभविष्य | ०८ डिसेंबर २०१९ | रविवार

कसा आहे तुमचा आजचा दिवस?  

Updated: Dec 8, 2019, 08:09 AM IST
आजचे राशीभविष्य | ०८ डिसेंबर २०१९ | रविवार

मेष- बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण कराल. कौटुंबीक नात्यांमध्ये सुधारणा होईल. स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. कौटुंबीक समस्यांवर लक्ष द्या. काही घरगुती प्रकरणांमध्ये जास्त वेळ जाईल. 

वृषभ- कामात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी अतरांकडून सन्मान मिळेल. अपूर्ण कामं मार्गी लागतील. वेळ चांगला आहे. अविवाहितांसाठी चांगला काळ आहे. प्रवासयोग आहे. 

मिथुन- घाईघाईत कोणतंही काम करु नका. आर्थिक बाबतीत चिंता करावी लागेल. नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत गुंतागुंत वाढेल. पोटाचे विकार उदभवतील. 

कर्क- नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतील. दैनंदिन कामांमध्येही काही अडचणी येतील. जास्त विचार करण्यात वेळ व्य़तीत करु नका. आरोग्याच्या बाबतीच चढ- उतार जाणवतील. डोकेदुखी आणि डोळ्यांचे विकार उदभवतील. 

सिंह- कुटुंबात सुखशांती नांदेल. कामाच्या ठिकाणी नवी तडजोड करावी लागू शकते. दुसऱ्याच एखाद्या गोष्टीवर तुमचं लक्ष असेल. कामाच्या ठिकाणी कोणाचीतरी नकळत मदत होईल. 

कन्या- कामाचा व्याप वाढेल. कनिष्टांची मदत मिळेल. अडचणी दूर होतील. दिवस थकवणारा असेल. आराम करण्याला प्राधान्य द्या. 

तुळ-  नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न कराल. साथीदारावर राग व्यक्त करु नका. कोणावरच भावना लादू नका. 

धनु- दैनंदिन कामं पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश करु नका. 

मकर- आज कोणतेही नवे व्यवहार करु नका. एखाद्या ठिकाणी पैसे अडकू शकतात. मनाविरुद्ध पैसे खर्च करावे लागतील. आज आखलेले बेत गुप्तच ठेवा. वाद- विवादामध्ये अडकू शकता. 

कुंभ- आर्थिक चणचण संपेल. मिळकत आणि खर्च यांच्यात समतोल असेल. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रयत्न करा, अडचणींवर तोडगा काढा. 

मीन- व्यापार वाढवण्याचा विचार करा, फायदा होईल. महागड्या वस्तूंची खरेदी करण्याचा प्रयत्न कराल. सावध राहा. थकवा जाणवेल.