मेष - जर तुम्हाला काही हवं असेल तर ती गोष्ट आज मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आहात ती गोष्ट तुम्हाला सहज मिळेल. प्रत्येक कमांसाठी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
वृषभ - स्वतःला प्रेरीत करा. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टी तुम्हाला आरामात मिळत होती. पण आत थोडी मेहनत घ्यावी लागेल. कामावर लक्ष केंद्रीत करा. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन - आज तुम्हाला निर्णय घेणं सोप जाईल. भूतकाळात केलेले कार्य आता लाभदायक ठरतील. काम थांबले असले तरी पुढे यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
कर्क - स्वतःचे निर्णय स्वतःच घ्याल. ही अत्यंत चांगली बाब आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामं वाढू शकतात. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. नव्या संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत आधी केलेल्या कामांमधून प्रगती, फायदा होण्याची शक्यता आहे.
सिंह - तुम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रचंड विचार करता. चिंता करण्याचे काही. काही गोष्टी तुमच्या विरूद्ध आहेत असा विचार तुम्ही करता. पण असं काही नाही. योग्य वेळेचा प्रतिक्षा करा. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या - आज कोणत्याही गोष्टीची माहिती तुमच्या पर्यंत ठेवू नका. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील.
तुळ : नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : तुमची परिस्थिती बदलण्याच सामर्थ्य हे तुमच्यातच आहे. मन आणि मेंदू यांच्यात मेळ घालण्याचा प्रयत्न करा. याचा नक्कीच फायदा होईल आणि संयम बाळगा.
धनु : वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत सुरू असलेला तणाव मिटण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना सहकाऱ्यांची मदत घ्या.
मकर : नोकरदार वर्गाने थोडा संयम बाळगावा. सहकार्यांकडून मदत मिळेल. जोडीदाराकडूनही मदत मिळेल. अविवाहितांसाठी पुढचे काही दिवस चांगले येणार आहेत. व्यावसायिकांसाठी ही सुवर्ण संधी.
कुंभ : आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन : नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.