आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ८ मार्च २०१९

या राशीच्या व्यक्तींसाठी दिवस चांगला. 

Updated: Mar 8, 2019, 09:44 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ८ मार्च २०१९ title=

मेष - आपल्या कामाविषयी गंभीरतेने विचार करा. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नवीन लोकांशी झालेल्या ओळखीने फायदा होऊ शकतो. शिक्षण, व्यवसाय, नोकरीत महत्त्वपूर्ण कामासाठी प्रवास होऊ शकतो. प्रवासादरम्यान काही नवीन गोष्टी समजू शकतात. विवाहासंबंधी चर्चा होऊ शकते. सकारात्मक व्यक्तीशी चर्चा होईल.

वृषभ - आज अचानक फायदा होऊ शकतो. धनलाभाचा योग आहे. आज अशा व्यक्तीशी भेट होऊ शकते जे तुम्हाला तुमचे विचार बदलण्यास प्रेरित करू शकतात. तुम्ही आपल्या भावना आणि समस्या शेअर करू शकता. दररोजची कामे पूर्ण होतील. साथीदाराचे सहकार्य मिळू शकते. 

मिथुन - आज तुम्ही अतिशय खुश असाल. काही नवीन लोकांशी जोडले जाल. नातेसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा.

कर्क - मुलांकडून मदत मिळू शकते. व्यवसायात अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. पैशांसंबंधी काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज दिवसभर सकारात्मक राहाल. आज ज्या गोष्टीसाठी प्रयत्न कराल, त्यात यश मिळेल. आज विचार केलेली सर्व कामे पूर्ण होतील.

सिंह - आज काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आज नवीन लोकांशी मैत्री होण्याचा योग आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही चांगले बदल होतील. तुमची वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी व्हाल. साथीदारासोबत असलेल्या संबंधांत सुधारणा होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.

कन्या - आज तुमचा दृष्टीकोन सहानभूतीपूर्वक असेल. अनेक गोष्टींचा तुम्ही खोलवर जाऊनच विचार कराल. आई-वडिलांसोबत चांगले संबंध राहतील. तुमच्या सोबत असलेल्या अनेकांना तुमची मदत होऊ शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील.

तुळ - कोणत्यातरी कारणाने मनात उत्सुकता राहील. चांगले बोलून तुमचे प्रयत्न पूर्ण होऊ शकतात. महत्त्वपूर्ण गोष्टी करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज निस्वार्थी भावनेने अनेक कामं कराल. सकारात्मक राहाल. दिवस चांगला आहे. स्वत:वर विश्वास ठेवा त्याने तुमचे आरोग्यही चांगले राहील. 

वृश्चिक - सुखद आणि आनंददायक दिवस आहे. स्वत:त काही चांगले बदल करण्याचे प्रयत्न कराल. काही योजना मनात असल्यास त्यासाठी दिवस चांगला आहे. पैसे कमवण्यासाठी काही नवे मार्ग मिळू शकतात. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल.

धनु : आज व्यावहारिक राहाल. त्यामुळे फायदा होईल. सामाजिक गोष्टीत सक्रीय रहाल. भावनिकदृष्ट्या उत्साहित राहाल. स्वत:वर पूर्ण विश्वास असेल. नवीन विचार मनात येतील. प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.

मकर - आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यस्त राहाल. आपल्या कामापासून मागे होऊ नका. पैसे कमवण्यासाठी काही नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. आत्मविश्वासाच्या जोरावर स्वत:ची चांगली ओळख निर्माण करू शकाल. मुलांच्या प्रगतीने खुश व्हाल. व्यावसायात नवीन योजना बनवाल त्यामुळे मोठा फायदा होऊ शकतो. 

कुंभ - पैशाच्या बचतीबाबत गंभीर राहा. दिवस चांगला आहे. भविष्यातील योजनांवर लक्ष द्या. साथीदारासोबत मतभेद संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत यश मिळेल. साथीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. मुलांसंबंधी चांगली बातमी मिळेल. आई-वडिलांची मदत मिळेल. 

मीन - नशीबाची साथ मिळेल. आज काही नवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित व्हाल. काही गोष्टींसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीत काही नवीन जबाबदारी मिळू शकेल. कामात मन लागेल.