Maha Daridra Yog 2023: सूर्य गोचरमुळे बनलाय 'महादरिद्र योग'; पुढचे 6 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच

Maha Daridra Yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रह आणि त्यांच्या चाली बदलतात तेव्हा त्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होतो. सूर्याच्या या गोचरमुळे महादरिद्र योग तयार झाला आहे. 17 ऑगस्टपर्यंत सूर्य या राशीमध्ये राहणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Aug 11, 2023, 05:40 AM IST
Maha Daridra Yog 2023: सूर्य गोचरमुळे बनलाय 'महादरिद्र योग'; पुढचे 6 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच title=

Maha Daridra Yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रह आणि त्यांच्या चाली बदलतात तेव्हा त्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होतो. ग्रहांच्या या स्थितीला गोचर म्हणतात. दरम्यान ग्रहांच्या हे गोचरमुळे काही शुभ योग तयार होतात. तर काहीवेळी अशुभ योग देखील तयार होताना दिसतात. असाच आता सूर्याच्या गोचरमुळे अशुभ योग तयार झाला आहे. 

गेल्या महिन्यात सूर्य ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला होता. दरम्यान सूर्याच्या या गोचरमुळे महादरिद्र योग तयार झाला आहे. 17 ऑगस्टपर्यंत सूर्य या राशीमध्ये राहणार आहे. त्यामुळे पुढचे 6 दिवस काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक असणार असल्याचं म्हटलं जातंय. यावेळी काही राशींच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. जाणून पुढचे 6 दिवस कोणत्या राशीच्या व्यक्तींना कठीण काळाचा सामना करावा लागणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा फार कठीण काळ आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. पुढचे 6 दिवस तुम्हाला सांभाळून रहावं लागणार आहे. तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  वेळेवर काम पूर्ण न केल्याने तुमच्या अडचणी वाढू शकतात. आर्थिक नुकसानाबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. संघर्ष आणि वाद होण्याचीही दाट शक्यता आहे. धनहानी होण्याची शक्यता आहे. 

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांवर महादरिद्र योगाचे दुष्परिणाम होताना दिसणार आहे. पुढील 6 दिवस या राशीच्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विचार करूनच एखाद्याला कर्ज द्या. आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

धनू रास

सूर्य गोचरमुळे तयार झालेल्या महादरिद्र योगाचा प्रभाव धनु राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जात नाहीये. पुढचे 6 दिवस या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. यासोबतच महादरिद्र योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. प्रेम जीवनात जोडीदारासोबत तणाव होऊ शकतो. वैवाहिक जीवनातही अडचणी येऊ शकतात. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )