Sun Transit In Aquarius : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 11 फेब्रुवारीला शनि अस्त झाल्यानंतर व्हॅलेंटाइन डेपूर्वी सूर्य ग्रह पण आपली स्थिती बदलणार आहे. येत्या 13 फेब्रुवारीला दुपारी 3:31 वाजता सूर्य कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तब्बल एक वर्षांनी सूर्यदेव शत्रू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनि ग्रह आधीपासूनच कुंभ राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत कुंभ राशीत शनि आणि सूर्यदेवाची भेट होणार आहे. ही भेट काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. कारण कुंभ ही शनीची रास असून दोन ग्रहांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात मानल जातं. त्यामुळे काही राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाव लागणार आहे. यासोबतच समाजात तुमच्या सन्मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. (Surya Gochar 2024 Sun Transit Aquarius before Valentine Day solstice on this zodiac sign one month from February 13)
कर्क राशीत सूर्य आठव्या घरात असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाचा सामना करावा लागणार आहे. यासोबतच एकाग्रतेचा अभाव जाणवणार आहे. नोकरीच्या बाबतीत थोडे सावध राहाण तुमच्या हिताच ठरेल. तुमचा राग नियंत्रणात ठेवा अन्यथा होणारी कामंही बिघडतील. सहकाऱ्यांशी काही मुद्द्यावरून मतभेद होणार आहेत. यासोबतच तुम्हाला व्यवसायात काही अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.
सिंह राशीमध्ये सूर्य सातव्या घरात असणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचे मित्रांसोबत काही गैरसमज होणार आहेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातही फारसा नफा मिळणार नाही. तुमची रणनीती बदलणे गरजेच आहे. आत्मविश्वासाची कमतरता जाणवणार आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक बाबतीत सावध राहा. काही कारणाने आयुष्यात पैशाची कमतरता जाणवणार आहे.
वृश्चिक राशीमध्ये सूर्य चौथ्या घरात असणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. नोकरदार लोकांना नोकरी बदलण्याची वेळ येणार आहे. एकाग्रतेच्या अभावामुळे तुम्ही तुमच्या कामावर योग्य लक्ष केंद्रित करु शकणार नाही. तुम्हाला कामासाठी जास्त प्रवास करावा लागणार आहे. तुम्ही पैसे कमवण्यात बऱ्यापैकी यशस्वी व्हाल पण तो हातात टिकणार नाही. जोडीदारासोबतचे संबंध बिघडण्याची भीती आहे. काही मुद्द्यांवर तुमच्यामध्ये मतभिन्नता निर्माण होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)