Surya Gochar 2022: सूर्य ग्रह 16 जुलैला कर्क राशीत करणार प्रवेश, 'या' राशींना येणार अच्छे दिन!

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 30 दिवस लागतात

Updated: Jul 4, 2022, 01:06 PM IST
Surya Gochar 2022: सूर्य ग्रह 16 जुलैला कर्क राशीत करणार प्रवेश, 'या' राशींना येणार अच्छे दिन! title=

Surya Gochar in Kark Rashi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 30 दिवस लागतात. दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. 16 जुलै रोजी पुन्हा एकदा सूर्य आपली राशी बदल करत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य या राशीत 17 ऑगस्टपर्यंत असेल. सूर्य ग्रहाच्या या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींवर होईल. काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम होईल. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचा हा राशी बदल 3 राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

मेष - ज्योतिषशास्त्रानुसार 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ ठरणार आहे.पगारदार लोकांना या काळात प्रमोशन आणि वेतनवाढ मिळू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुम्ही व्यवसाय इत्यादीमध्ये मोठा करार निश्चित करू शकता.

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठीही हा काळ अतिशय शुभ राहील. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित लाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन - ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचे नशीब देखील सूर्यासारखे चमकेल. सूर्याचे राशी परिवर्तन शुभ काळ घेऊन येणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. पगारदारांना या काळात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या लोकांना फायदा होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)